मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये होणारी भाजीपाल्याची आवक लक्षणीयरित्या घटली आहे. परिणामी फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर जवळपास दुप्पटीने वाढले आहे. या सगळ्यामुळे आता सामान्य घरातील बजेट कोलमडताना दिसत आहे. सामान्य घरातील गृहिणी या वाढीव खर्चामुळे मासिक खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा या चितेंत दिसून येत आहे. (Vegetable price increase in Maharashtra)
घाऊक आणि किरकोळ दोन्ही बाजारपेठांमध्ये भाववाढ दिसून येत आहे. पालक ,मेथी ,कोथिंबीर हिरव्या मिरच्या ,टोमॅटो ,आणि मटार दुप्पट भावाने विकले जात आहेत. भाज्यांसोबतच डाळींचे भाव देखील वाढले आहेत . लॉकडाऊन आणि कोरोनाचा संकट असताना भाज्यांचे आणि डाळींचे दर वाढल्याने विक्रेते आणि ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
भाजीपाला घाऊक बाजार किरकोळ बाजारातील दर
मटार 150 ते 160 160 ते 180
फरसबी 80 ते 90. 80 ते 100
फ्लॉवर 80 ते 90. 80 ते 100
शेवगा 80 ते 90. 80 ते 100
कोबी 40 ते 60. 40 ते 70
भेंडी 50 ते 60. 50 ते 80
गवार 90 ते 100. 90 ते 110
टोमॅटो 32 50 ते 60
बटाटे 32 40
कोथिंबीर 30 50 ते 60
डाळ. घाऊक बाजारपेठ किरकोळ
मसूर डाळ 63 ते 68 80 ते 90
मूंग डाळ 110 120
तूर डाळ 120 130
उडीद डाळ 130 110
नांदेडमध्ये तुटवड्यामुळे भाजीपाला महागला
नांदेडमध्ये सध्या भाजीपाल्याने शंभरी पार केलीय. सगळ्याच भाज्यांचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य त्रस्त झालेयत. अतिवृष्टीमुळे बहुतांश भाजीपाला शेतातच सडून गेलाय, रेल्वेसेवा बंद असल्याने बाजारात भाज्यांची आवक कमी होतेय तर इंधनाच्या दरवाढीने वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम भाजीपाला महागण्यास कारणीभूत ठरलाय.
तसेच बहुतांश धरणे भरल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला सोडून रब्बी हंगामाची कास धरलीय. त्यातून भाजीपाल्याचे क्षेत्र कमी झाल्याचा परिणाम बाजारात दिसून येतोय. भाज्यांसोबत कांदे, बटाटे, लसूण , आले आणि अंडी याचेही भाव वाढलेत.
संबंधित बातम्या:
फ्लॉवर 120, कोथिंबीर 100 तर टोमॅटो 80 रुपये किलो, नागपुरात भाजीपाल्याचे दर गगनाला
परतीच्या पावसामुळे 36 हजार हेक्टरवरील पीक पाण्यात, शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू
राज्यात भाजीपाला महागला, पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ
Chandrapur Lockdown | रिक्षेतच भाजीपाला विक्री, चंद्रपुरात रिक्षाचालकाची हुशारी
(Vegetable price increase in Maharashtra)