नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना सध्या भाजीपाला मार्केटमध्ये गाड्यांची आवक वाढली आहे. आज मार्केटमध्ये एकूण 650 गाड्यांची आवक झाली असून भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. (Vegetable Prices Decrease in Mumbai AMPC market)
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमतीत चढ-उतार बघायला मिळत होते, मात्र आता बाजारात भाज्यांच्या दरात घसरण होत आहे.
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 650 गाड्यांची आवक झाली असून भाजीपाल्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. सध्या बाजारात भेंडी 20 ते 30 रुपये, कोबी 30 ते 40 रुपये, मिरची 30 ते 40 रुपये, विकली जात असून टोमॅटो 25 ते 35, वांगी 30 ते 40 तर कोथिंबीर 10 ते 20 रुपये दराने विकली जात आहे.
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती. पणजवळपास 8 महिन्यांनंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 627 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.
भेंडी 20 ते 30 रुपये प्रतिकिलो
कोबी 30 ते 40 रुपये प्रतिकिलो
मिरची 30 ते 40 रुपये प्रतिकिलो
टोमॅटो 25 ते 40 रुपये प्रतिकिलो
वांगी 30 ते 40 रुपये प्रतिकिलो
कोथिंबीर 10 ते 20 रुपये प्रतिकिलो
(Vegetable Prices Decrease in Mumbai AMPC market)
संबंधित बातम्या
सर्वसामान्यांसाठी खुशखबर; मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे आवक वाढल्याने दरात स्थिरता