पुन्हा काय झाडी, काय डोंगर..विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती

| Updated on: Jun 19, 2024 | 9:57 AM

Vidhan Parishad Election 2024 : राज्यातील लोकसभा निकालानंतर महायुती की महाविकास आघाडी, कोण कुणाला धडा शिकवणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात पुन्हा एकदा कुरघोडी करण्याचा प्रयत्न दिसणार आहे. नाराजीचा फटका बसणार कुणाला?

पुन्हा काय झाडी, काय डोंगर..विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती
Follow us on

राज्यात लोकसभा निकालात महाविकास आघाडीने महायुतीला पाणी पाजले. राज्यातील हाराकिरी महायुतीच्या जिव्हारी लागली आहे. त्यातच घटक पक्षातील शाब्दिक चकमकींनी डोके वर काढले आहे. अजित पवार गट विरोधात भाजप असा समाना रंगला आहे. तर महाविकास आघाडीत पण मोठा भाऊ कोण? यावरुन शीतयुद्ध सुरु आहे. त्यातच विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती वाढली आहे. परिणामी हेवेदावे विसरुन विधान परिषदेत विजयाची गोळाबेरीज कोण करते हे निकाल दाखवून देईल.

निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती

या विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंगची शक्यता व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीमुळे महायुतीमध्ये निराशेचे वातावरण आहे. तर आता पराभवाचे खापर एकमेकांवर पण फोडण्यात येत आहे. त्यातच या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या विधानपरिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्यामुळे कुंपणावर (विरोधकांच्या संपर्कात) असलेले आमदार हे क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

पुन्हा काय झाडी, काय डोंगर

12 जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागेच्या निवडणुकीदरम्यान राज्यात पुन्हा एकदा आमदारांसाठी हॉटेल पॉलिटिक्स होऊ शकते. ११ जागेच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मतांची गोळा बेरीज करण्यासाठी रस्सीखेस पाहायला मिळणार आहे.

महाविकास आघाडीची खेळी

सध्या विधानसभेचे संख्याबळ 274 आहे. त्यामुळे भाजपा आमदारांच्या संख्याबळानुसार 5 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित दादा प्रत्येकी दोन-दोन विधान परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात. काँग्रेस पक्षाची 1 जागा सहज निवडून येऊ शकते. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे संयुक्त म्हणून एक जागा निवडून येऊ शकते. मात्र मतांची गोळा बेरीज करून महाविकास आघाडी मधील काही नेतेमंडळी यापेक्षा वेगळं, समीकरण करण्याचा नक्की प्रयत्न करतील.

या निवडणुकीत संभाव्य गणित पाहून आणखीन ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे,विधान परिषद निवडणूक ही अधिवेशन कालावधीत येत असल्यामुळे या काळात हॉटेल पॉलिटिक्स होण्याची दाट शक्यता आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल

भाजप -१०३
शिंदे सेना – ३७
अजित पवार गट -३९
काँग्रेस – ३७
ठाकरे गट – १६
शरद पवार गट  -१३
बाविआ -३
समाजवादीपक्ष – २
एमआयएम – २
प्रहार – २
मनसे १
माकप – १
शेकाप  -१
स्वाभिमानी पक्ष – १
रासप  -१
जनसुराज्य – १
क्रा शे प १
अपक्ष – १३

———–

एकूण २७४