मुंबई : उद्या राज्यात विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) दहा जागांसाठी मतदान पार पडत आहे. त्यासाठी तयारी जोरदार सुरू आहे. या निवडणुकीबाबत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) अशी दोन्हींकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. दोन्हीकडून विजयाचे दावेही केले जात आहेत. या निवडणुकीबाबतच आता आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी विधान परिषदेचं गणित हे क्रिकेटच्या भाषेत समजावून सांगितलं आहे. तसेच एखादी मॅच हरतो त्यातून शिकावं लागलं. पीच तेच, प्रतिस्पर्धी तेच आहे. त्यामुळे आपण सर्व काळजी घेऊ, पण भाजपवाले नक्की थर्ड अंपायरकडे जाऊ शकतात. मविआ चिडली असं ते म्हणू शकतात. किंवा मत बाद करु शकतात, असे म्हणत त्यांनी राज्यसभेच्या मतदानावेळी घेतलेल्या आक्षेपावरही भाष्य केलं आहे. त्याची पुन्हा पुरावृत्ती होऊ शकते, असा अंदाजही रोहित पवारांनी वर्तवला आहे.
तसेच रोहित पवार यांनी आमदारांच्या नाराजीबाबत आणि त्यांना वेळ देण्याबाबतही भाष्य केलं आहे. अजितदादा नेहमी सर्व आमदारांना वेळ देतात, शिवसेना नाराज नाही. मात्र राऊतांनी जाहीर ॲलिगेशन लावले ते व्हायला नको होतं. पण आता आमदारांची नाराजी दूर केली आहे. आमच्याकडे नेहमी संवाद असतो, असेही रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तर निवडणूक आयोगावर आमची विश्वास आहे. उद्या रन आऊट कोणी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पाच उमेदवार आहेत त्यापैकी दुसरा तिसराही रन आऊट होऊ शकतो, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
तर नाराजीच्या बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अशा बातम्या पसरवले जात आहे .कितीही भ्रम तयार भाजपने केला तर त्यांना त्याचे फळ मिळणार नाही. तसेच याविषयी कधीही चर्चा झाली नाही तिन्ही नेते आणि महाविकास आघाडीचा संवाद उत्तम आहे, तसेच नवाब मलिकांना आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क डावळला आहे. संविधान आणि नैतिक अधिकार डावलणं चुकीचं आहे. 302 च्या कैद्याला मतदानाचा हक्क असतो. मात्र या ठिकाणी कोणत्या कलमाणे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानापासून लांब ठेवण्यात आलंय? असा सवालही राऊतांनी केला आहे. महाविकास आघाडीची 2 मते कमी करण्यासाठी हे पडद्या मागून सर्व सुरू आहे, त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.