विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका, म्हणाले, लाचारी पत्करून….

| Updated on: Oct 08, 2022 | 4:12 PM

पाच लाख मदत अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना देऊन होणार नाही.

विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका, म्हणाले, लाचारी पत्करून....
विनायक राऊतांचे टीकास्त्र
Image Credit source: social media
Follow us on

गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीका केली. विनायक राऊत म्हणाले, नारायण राणेंसारख्या तकलादू आणि स्वार्थी नेत्याच्या आरोपाला आम्हाला काडीचीही किंमत द्यायची नाही. लाचारी पत्करून राजकारणात काम करणारा माणूस म्हणजे नारायण राणे होय. तुम्ही लाचारी पत्करता. त्या लाचारांमध्ये विनायक राऊतांची तुम्ही गिणती नाही करू शकत, असा टोलाही विनायक राऊत यांनी नितेश राणे यांनाही लगावला. नितेश राणे यांनी विनायक राऊतही शिंदे गटात जाणार होते, असा गौप्यस्फोट केला. त्यावर उत्तर देताना राऊत बोलत होते.

विनायक राऊत म्हणाले, नाशिक येथील घटना दुर्दैवी आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळंच ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची सखोल चौकशी व्हा. दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे.

बीकेसी मेळाव्यावर अनधिकृतपणे समृद्धी महामार्गाचा वापर केला गेला. तिथंसुद्धा दहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. वाहतुकीचा बेशिस्तपणा मोडून काढावा लागेल. नियम कडक करण्याची गरज आहे.

नाशिककडं जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मुंबई ते नाशिक सहा तासांचं अंतर झालं आहे. रस्त्याची दुर्दशा का झाली. अद्याप रस्ते दुरुस्त का झाले नाहीत, असा सवालही राऊत यांनी विचारला.

मुख्यमंत्री नाशिकला गेलेत. पाच लाख मदत अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना देऊन होणार नाही. कर्ते कमविते लोकं गेलेत. मृतकांच्या वारसदारांना किमान दहा लाखांची मदत करण्याची आवश्यकता आहे, असंही राऊत म्हणाले.

शिवसेनेकडून पक्षचिन्हाविषयी पुरावे सादर करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात विनायक राऊत म्हणाले, सात ऑक्टोबरला अनिल देसाई यांनी साडेचार वाजता निवडणूक आयोगाकडं सर्व कागदपत्र सादर केले आहेत.

पण, त्याची खातरजमा निवडणूक आयोगानं केली आहे. याची दखल घेण्याची गरज आहे. निवडणूक आयोग कुणाच्या दबावाखाली काम करतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिंदे गटाची सात लाखांची सदस्य नोंदणी बोगस आहे. दहा लाखांच्या जवळपास आमचीही नोंदणी झाली आहे. पक्षाची नोंदणी आणि लोकप्रतिनिधी याचं वेगळ गणित असतं. याचा अभ्यास त्यांना करावा लागेल.

शिंदेंच्या नातवावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. हे शब्द मागे घ्यावेत, असं फडणवीस म्हणालेत. यावर विनायक राऊत म्हणाले, ठाकरे यांनी कुठलेही कुत्सित शब्द नातवाबद्दल वापरले नाहीत. तो नगरसेवक होऊ शकतो, असं म्हटलं. याचा अर्थ नातवाचं कौतुक केलं.