मुंबई : अजित पवार आणि दीपक केसरकर या दोन्ही नेत्यांचे सभागृह आवारातले दोन व्हिडीओ सध्या व्हायरल होतायत. सोशल मीडियात या व्हिडीओ चर्चा का होतेय. पाहूयात हा रिपोर्ट.
विधानभवनात घडलेल्या दोन प्रसंगांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहेत. एक व्हिडीओ आहे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांचा आणि दुसरा व्हिडीओ आहे अजित पवारांचा विधानभवनाबाहेर अजित पवार पत्रकारांशी संवाद साधत होते. त्याचवेळी उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधण्यासाठी येत असल्याचं अजित पवारांना समजलं.
अजित पवारांनी उद्धव ठाकरेंसाठी जागा करुन दिली. मात्र त्यानंतर अजित पवारांनी समोरच्या गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे पाहून डोळा मारला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला.
दुसरा व्हिडीओ आहे दीपक केसरकरांचा. उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल होत होते. त्यावेळी दीपक केसरकरांनी दोन ते तीन वेळा नमस्कार केला. त्याकडे उद्धव ठाकरेंचं लक्ष नव्हतं. मात्र थोडं अंतर पुढे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं आणि त्यांनी केसरकरांकडे हात दाखवल्याचं व्हिडीओत तरी दिसतंय.
विधानभवनाबाहेर नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोप करत असली. तरी विधानभवनात असे प्रसंग साधारण आहेत. मात्र राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे कोणत्याही भेटीचा आणि प्रसंगाचा व्हिडीओ चर्चेत आल्याशिवाय राहत नाही.