विरार : विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांची पोलिसांना बघताच एकच तारांबळ उडाली. यातील काही तरुणांनी थेट समुद्रात उडी मारुन पोहत होडीचा आधार घेतला. ही सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झाली. (Virar Cricket Player Jump Into Sea Video Viral)
आज सकाळी 11 च्या सुमारास तरुणांचा ग्रुप समुद्रकिनारी क्रिकेट खेळत होता. मात्र अचानक अर्नाळा सागरी पोलिसांनी या भागात एंट्री केली. यानंतर त्या क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांनी हातातील बॅट सोडून पोलिसांपासून वाचण्यासाठी चक्क समुद्रात उडी मारली. त्यानंतर पोहत पोहत या तरुणांनी होडीचा आधार घेत पोलिसांपासून पडणारा मार अखेर वाचवला.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
वसई विरारमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. वसई-विरार महापालिका कोरोना रुग्णांनी दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. मात्र तरीही सोशल डिस्टन्सिंग न राखणाऱ्यावर पोलीस कारवाई करत आहे.
वसई विरारमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. गेल्या 4 दिवसात 30 कोरोनाबळी गेले आहेत. तर 779 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. वसई विरार क्षेत्रात कोरोनाबाधित मृत्यूची संख्या 219 झाली आहे. सुदैवाने 6 हजार 972 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उर्वरित 3 हजार 415 जण कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (Virar Cricket Player Jump Into Sea Video Viral)
संबंधित बातम्या :
राज्यभरात दमदार पाऊस, औरंगाबादमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं, संगमनेरचा तामकडा धबधबा कोसळला