मुंबई : शुक्रवारी शरद पवार (sharad pawar) यांच्या घराबाहेर झालेल्या आक्रमक आंदोलनावेळी पोलीस (Mumbai Police) अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावरून आता मुंबई पोलीस दलात मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. झोन 2 चे डीसीपी योगेश कुमार यांना तिथून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या ठिकाणी निलोत्पल यांची नियुक्ती विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre-Patil) यांनी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई पोलीस काय करत होते, मुंबई पोलिसांना कशी माहिती मिळाली नाही. पोलीस खातं सपशेल अपयशी ठरले असल्याचे विरोधकांबरोबरच खुद्द अजित पवार यांनीही म्हटलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. राज्याचे गृहखाते हे सध्या राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील-यांच्याकडेच आहे. त्यात हे खातं राष्ट्रवादीकडे असून पोलीस प्रशासन एवढं गाफील राहिलं आणि हे आंदोलन पवारांच्या घरापर्यंत पोहोचलं त्यावरून ही टीका होत होती.
Mumbai Police’s Joint Commissioner (Law and Order) Vishwas Nangre Patil removed DCP (Zone II), Yogesh Kumar from his post for failing to discharge his duties in connection with the protest outside the Mumbai residence of Sharad Pawar yesterday.
— ANI (@ANI) April 9, 2022
या हल्ल्याची पोलिसांना माहिती नव्हती का? पोलीस प्रशासन आणि इतर विभाग काय करत होता? या आंदोलकांचे एवढे धाडस झाले की पवारांच्या घरापर्यंत पोहोचले. मीडिया आधी पोहोचला पण पोलीस पोहोचले नाही, असे म्हणत अजित पवारांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणी सुरक्षेत चूक केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल, असा इशारा दुपारीच दिलीप वळसे-पाटील यांनी दिला होता.
राज्याचा पोलीस विभाग हे प्रकरण वेळीच रोखण्यात अपयशी ठरला आहे. याचा शोध घेतला जाईल, मात्र पोलिसांचं अपयश आहे, एवढं नक्की आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली होती, तर देवेंद्र फडणवीसांनी हाच मुद्द पकडत अनेक सवाल उपस्थित केले होते. पोलीस प्रशासनाला या आंदोलनाची माहिती आधी कशी मिळाली नाही, असा सवाल फडणवीसांनीही केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून गृह विभागाच्या भूमिकेवरूनही अनेक सावल उपस्थित केली जात आहे, आता पुन्हा या प्रकरणानंतर गृह विभागाविषयी सवाल उपस्थित झाल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Gunratna Sadavarte: सुरक्षेत चूक ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार; दिलीप वळसे पाटील यांची माहिती