सीमावादावर राऊतांची प्रतिक्रिया तिखट, प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटातील या नेत्यांनी हद्द केली…

| Updated on: Dec 21, 2022 | 11:25 PM

बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी हा विषय उपस्थित केल्यानंतर बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला चिथावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा वाद प्रचंड तापला असल्याचे दिसून येत आहे.

सीमावादावर राऊतांची प्रतिक्रिया तिखट, प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटातील या नेत्यांनी हद्द केली...
Follow us on

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन महाराष्ट्रामधीलचती नेत्यांमध्ये आता जुंपली आहे. सीमावादावरुन संजय राऊत यांनी तिखट शब्दात टीका केल्यानंतर त्या टीकेला शिंदे गटाच्या संतोष बांगर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोज उठतात आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कानफाटात मारतात, आणि मुख्यमंत्री, उपमख्यमंत्री गाल चोळत मंत्रालयात जातात अशी टीका संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केली होती.

तर त्याला प्रत्युत्तर देत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत हा पिसाळलेला कुत्रा आहे, त्याच्या कानशिलात लगावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशा खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केली. त्यामुळे राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये प्रचंड जुंपली असल्याचे दिसून आले आहे.

सीमावादावरुन संजय राऊत यांनी अशी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. आणि त्याचं कारण आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे महाराष्ट्राला डिवचणारे आणखी एक वक्तव्य.

महाराष्ट्रासोबत सीमावाद संपला असून महाराष्ट्राला आता एक इंचही जमीन देणार नाही. त्यासंदर्भात सभागृहात प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे बसवराज बोम्मई यांनी म्हटले होते.

बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी हा विषय उपस्थित केल्यानंतर बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला चिथावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा वाद प्रचंड तापला असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावरुन काहीही बोलू नये, असं अमित शाह यांच्या बैठकीत सांगण्यात आले होते. पण तरीही बोम्मई यांच्याकडून केंद्राचंही ऐकण्याची त्यांची मानसिकता दिसत नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला इशारे देत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शांत का ? असा सवाल विरोधकांचा आहे..तर बोम्मईंची मुजोरी आणि धमक्या सहन करणार नाही, अशा शब्दात सीमावाद समन्वयक मंत्री शंभूराज देसाईंनी ठणकावले आहे.

खरं तर सीमावादावरुन दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत शिंदे आणि बोम्मईंची बैठक झाली होती, पण या बैठकीत जे काही ठरलं आहे, त्याचं उल्लंघन कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत.

2 दिवसांआधीच महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा होऊ न देता कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आता एकही इंच जमीन देणार नाही, असं सूचवणारा प्रस्ताव विधीमंडळात पास करण्याचा डाव बोम्मईंचा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकातील सीमावादावरून आता आपल्याच राज्यातील नेते आपापसात भांडत असल्याची टीका केली जात आहे.