मुंबई : वांद्रे ते जोगेश्वरी विभागात गेले तीन दिवस पाणी नसल्यामुळे तेथील रहिवाशांच्या समस्या वाढू लागल्या (Water shortage due to metro) आहेत. मेट्रोच्या कामामुळे वांद्रे ते जोगेश्वरी विभागात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे येथे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे असूनही अजून पालिकेने याची दखल घेतली नसून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पाणी नसल्याने लोकांनी थेट बिस्लरी बॉटलचे पाणी कपडे, भांडी आणि आंघोळीसाठी विकत (Water shortage due to metro) घेतलं आहे.
जोगेश्वरी पूर्व येथील कोकण नगरमध्ये काही लोक टँकरने आपल्या घरात पाणी भरत आहेत. तर काहींनी बिस्लरी बॉटल विकत घेतल्या आहेत. गेले तीन दिवस लोक रस्त्यावर पाणी भरण्यासाठी गर्दी करत आहेत. पण दररोज बिस्लरी बॉटल विकत घेणेही सर्वसामान्य व्यक्तीला परवडणे कठीण आहे. त्यामुळे लवकरात लवकर फुटलेल्या पाईप लाईनचे काम पूर्ण करुन पाणी सुरु करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
“वांद्रे ते जोगेश्वरी या विभागात गेले तीन दिवस पाणी नसल्याने लोक हैराण झालेले आहेत. अंधेरी ईस्टमधल्या अनेक सोसायट्यांमध्ये लोक हवालदिल झालेत. या मेट्रोच्या कामामुळे एक महत्वाची पाईपलाईन फुटली आणि प्रचंड प्रमाणात पाणी वाहून गेलं. या विभागातल्या हजारो लोकांना वेठीला धरल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कुठेही टँकर्स उपलब्ध होत नाहीयेत”, असं अभिनेता किशोर कदम उर्फ कवी सौमित्रने सांगितलं
“वांद्रे ते जोगेश्वरी विभागात गेले तीन दिवस पाणी नसल्याने लोक हैराण झाले आहेत. पाण्याच्या टँकर्सच्या दरातही वाढ झाली आहे. घरात एक थेंबही पाणी नाही. दररोज बिस्लरीच पाणी किती खरेदी करणार? जे विकत घेऊ शकत नाही त्यांचं काय, विभागातील शासकीय अधिकारी यावर लक्ष देतील का?” असा सवाल अभिनेता किशोर सौमीत्रने उपस्थित केला आहे.
पाणी कपातीमुळे टँकर्सच्या दरातही वाढ
पाणी कपात असल्यामुळे पाण्याच्या टँकर्सनेही आपल्या दरात वाढ केली आहे. या सगळ्यांनी चौदाशेवरुन थेट पाच-सह हजारांवर आपले दर नेले आहेत. पालिकेच्या ऑफिसमध्ये लोक टँकर्ससाठी रांगा लावून लोक उभे आहेत.