मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज (17 मार्च) ठाकरे सरकारची महत्त्वाची कॅबिनेट बैठक होत आहे. यात मुंबईत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई लोकल बंद करण्याच्या निर्णयावर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आधीच आपण कोरोनाच्या फेज 2 मध्ये आहोत. फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊच नये यासाठी आपला प्रयत्न करत असल्याचं मत व्यक्त केलं आहे (Rajesh Tope on Corona Phase 2). तसेच यासाठी जगभरात प्रयत्न झाले आहेत. त्याचा अभ्यास करुन अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जातील, असंही म्हटलं आहे.
Live Updates
[svt-event title=”पूर्व कॅबिनेट बैठक सुरु, मुंबई लोकलवर निर्णय होण्याची शक्यता” date=”17/03/2020,4:06PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: कॅबिनेट बैठकीपूर्वी होणारी पूर्व कॅबिनेट बैठक सुरु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आदित्य ठाकरे, मुंबईचे आयुक्त परमबीर सिंह उपस्थित, आरोग्य विभागाचे आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारीही उपस्थितhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/QjAMyrZyMq
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 17, 2020
[svt-event title=”मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे, बस आणि मेट्रोसेवा तब्बल 7 दिवस बंद ठेवण्याचा विचार” date=”17/03/2020,1:34PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे, बस आणि मेट्रोसेवा तब्बल 7 दिवस बंद ठेवण्याचा विचार, आजच्या कॅबिनेट बैठकीकडे राज्याचं लक्ष https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/6lhueBhMPq
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 17, 2020
[svt-event title=”कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई लोकल बंदवर विचार” date=”17/03/2020,1:28PM” class=”svt-cd-green” ] कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई लोकल बंदवर विचार, कॅबिनटे बैठकित अंतिम निर्णय होणार, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती [/svt-event]
राजेश टोपे म्हणाले, “रेल्वेच्या बोग्यांमध्ये जास्तीतजास्त किती माणसं असावेत याबाबत काही मार्गदर्शक सुचना देण्यात येण्याबाबत विचार सुरु आहे. कारण पुढील 15 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण फेज 2 मध्ये आहोत. त्यामुळे या फेजमध्ये कोरोनावर नियंत्रणासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. आपण फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊच नये यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या केल्या जातील. औषध कंपन्यांनी जगभरात इतर देशांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जे प्रयत्न झाले त्याचीही माहिती दिली आहे. त्याचाही उपयोग केला जाईल.”
‘करोना’च्या पार्श्वभूमीवर उद्योजकांसोबत मुंबई येथे बैठक सुरू.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य खात्याने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांचेही सहकाऱ्यासाठी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे.या बैठकीला 18 खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधी उपस्थित आहेत. pic.twitter.com/xhYpO98DB5
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 17, 2020
औषध कंपन्यांनी मोफत औषधं पुरवण्याची तयारी दाखवली आहे. या कंपन्या जागतिक स्तरावर काम करतात. त्यामुळे त्यांनी काही सुचनाही दिल्या आहेत. ते पूर्णपणे बंदच्या मताचे आहेत. बंद करण्याबाबत दोन भाग आहेत. आवश्यक आणि अनावश्यक. यातील अनावश्यक गोष्टी पूर्णपणे बंद करण्याचा विचार आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
“हातावर पोट असणाऱ्यांच्या पोटावर पाय पडू देणार नाही”
राजेश टोपे म्हणाले, “औषध कंपन्यांनी काही सुचना केल्या आहेत. जे लोक रोजंदारीवर काम करतात त्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये अशी काळजी संबंधित कंपन्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे छोटी नगरं, ग्रामीण भाग येथील कंपन्या बंद करु नये असंही त्यांचं मत आहे. यातून गरिब माणसाच्या पोटावर पाय पडू नये ही भावना आहे. त्यांचं उपजीविकेचं साधन हे त्यांचं हातावर पोट भरण्याचं आहे. त्यामुळे अशा असंघटीत कामगारांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.”
उद्योजकांकडून 100 टक्के काम बंद करण्याचं आश्वासन
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कंपन्या आणि लोकल रेल्वे बंद करणार का या प्रश्नावर राजेश टोपे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “उद्योजकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 50 टक्के नाही, तर 100 काम बंद करण्याचं आश्वासन दिलं आहे. कॉर्पोरेट्सकडे अनेक सुविधा असतात. व्हर्च्युअर सुविधा करुनही ते काम करु शकतात. त्याचा उपयोग करुन ऑफिस बंद ठेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काही गोष्टी मात्र बंद करता येणार नाही. औषधांचं वितरण आपल्याला बंद करता येणार नाही. नाहीतर महाराष्ट्रात सर्वदूर औषधं पोहचणार नाहीत. अशा अत्यावश्यक गोष्टी सोडल्या तर इतर कंपन्यांनी आपलं काम थांबवण्याची तयारी दाखवली आहे.”
“मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार”
मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि कॅबिनेट घेईल. तो माझ्या कार्यक्षेत्रातील भाग नाही. मात्र, सार्वजनिक आरोग्य म्हणून आम्ही हे नक्की सांगू की लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे एकत्र न येण्याच्या नियमांचं पूर्ण उल्लंघन होत आहे. कुठल्याही परिस्थितीत ही गर्दी कमी केली पाहिजे. लोकांनी फक्त बसून प्रवास केला पाहिजे. उभे असले तरी लोकलमध्ये गर्दी असायला नको, ही गोष्टी आम्ही आग्रहपूर्वक कॅबिनेटला सांगणार आहोत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
मंत्रालयातील अधिकाऱ्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह
राजेश टोपे म्हणाले, “भावाला आणि वहिनीला कोरोनाची लागण झाली आहे त्या मंत्रालयातील अधिकाऱ्याची कोरोना चाचणी निगेटीव्ही आली आहे. त्यामुळे मंत्रालयातील कोणताही कर्मचारी बाधित नाही. आता तुर्त आम्ही मंत्रालयातील प्रवेश पूर्ण बंद केला आहे. त्यामुळे मंत्रालयात आता बाहेरच्या लोकांना येण्यास परवानगी मिळणार नाही. मंत्रालयातील आहे त्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करता येईल का त्यावर कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय होईल. आमचा प्रयत्न मंत्रालयात गर्दी होऊ नये असाच आहे. जी कामं अतितातडीची नाहीत असं शोधून ती कामं बंद करता येणार असतील तर तसंही केलं जाईल.”
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
संबंधित बातम्या:
Maharashtra corona death | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, बाधिताच्या संपर्कात 9 जण
Maharashtra Corona: महाराष्ट्राला किंचित दिलासा, 15 तासात एकही नवा रुग्ण नाही : राजेश टोपे
पुण्यात तीन दिवस व्यापार बंद, मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार
Corona Updates: शिर्डीचे साईबाबा मंदिर आजपासून बंद
7000 मृत्यू, अमेरिकेत संचारबंदी, फ्रान्स लॉकडाऊन, कोरोनासमोर महाशक्तिशाली देशही हतबल
CoronaVirus: अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी, लवकरच बाजारात उपलब्ध होणार
Rajesh Tope on Corona Phase 2