मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने पहिल्यांदाच मीडियासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. आमच्या जीवाला धोका आहे, असं क्रांती रेडकरने सांगितलं.
क्रांती रेडकरने आज पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने समीर वानखेडेंवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांना येत असलेल्या धमक्यांबद्दलचीही माहिती दिली. आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. ट्रोल केलं जातं. लटकवून टाकू, जाळून टाकून, मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत आहेत. मात्र समीर यांच्या जॉबबद्दल हे पार्ट अँड पार्सल आहे असं वाटतं, असं क्रांतीने सांगितले.
त्यांच्या जीवाला धोका आहे. आम्हाला संरक्षण दिलं आहे. त्यामुळे सरकारचे आभारी आहोत. आमच्या कुटुंबाला धमकी दिली जात आहे. आमच्या जीवाला धोका आहे. आमच्याकडे कोणी पाहत असले तरी भीती वाटते. फेक अकाऊंटवरून आम्हाला धमकी दिली जात आहे. तुमची परेड करू, तुम्हाला जाळू अशा धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढले असून वेळ आल्यानंतर ते जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं.
वानखेडे या प्रकरणातून बाहेर पडणारच. शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. वेळच नवाब मलिकांना उत्तर देईल. अजूनही कटकारस्थान केले जातील. अनेक कागदपत्रं तयार केली जातील. त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण ती गोष्ट सिद्ध करणं सर्वात मोठी गोष्ट आहे. ते हे लोकं सिद्धच करू शकणार नाही. कारण हे सर्व खोटं आहे, असं त्यांनी सांगितलं.
एनसीपी नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकरी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला. त्यावर ‘समीर दाऊद वानखेडे’ असं लिहून फ्रॉडला इथूनच सुरुवात झाल्याचं म्हटलं आहे. आमच्या रिपोर्टरने वानखेडेंच्या मूळ गावी जाऊन वानखेडेंच्या वडिलांचं कास्ट सर्टिफिकेटच शोधून काढलं. pic.twitter.com/wr8t0vk4Dp
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2021
समीर वानखेडेंवर होणाऱ्या आरोपामुळे निश्चित त्रास होतोय, असं त्यांनी सांगितलं. मराठी असल्याचा मला अभिमान आहे. माझ्यात राज्यात मला घाबरवलं जातं, कोणीही उठून धमक्या देतंय. मला इतर राज्यातून सपोर्टचे फोन येत आहेत. आपल्या राज्यातूनही समर्थनाचे मेसेज येत आहेत. पण मला राज्यात घाबरलं नाही पाहिजे. आपल्याच राज्यात सुरक्षित वाटलं पाहिजे. आपलं स्टेट आणि पोलिसांनी मला सुरक्षा दिली आहे. माझी काळजी घेत आहे. समीर वानखेडेंचे विरोधक आम्हाला त्रास देत आहेत, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकार समजदार आहे. सहकार्य करणारी आहे. त्यामुळे सत्याचा विजय होईल. जेव्हा सत्य कळेल तेव्हा सरकार वानखेडेंच्या बाजूनेच उभी राहिल अशी खात्री आहे, असंही त्यांनी सांगितलं.
समीर केवळ कलाकारांना पकडत नाही. शंभर टक्क्यातून तीन टक्के लोक कलाकार असतील. ते डॉन किंवा ड्रग्ज पेडलर यांना पकडत असतात. त्यामुळे ते पर्सनल राग काढत आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. ते केंद्र सरकारच्या एजन्सीसोबत काम करत आहेत. मात्र, ते कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत, असंही तिने सांगितलं.
Here are the contents of the letter received by me from an unnamed NCB official.
As a responsible citizen I will be forwarding this letter to DG Narcotics requesting him to include this letter in the investigation being conducted on Sameer Wankhede pic.twitter.com/SOClI3ntAn— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021
संबंधित बातम्या:
समीर वानखेडे दिल्लीत, पंच प्रभाकर साईलच्या आरोपांवरुन एनसीबीच्या मुख्यालयात चौकशी
(We are paying price for honesty, husband’s track record is for all to see: kranti redkar)