मुंबई : राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे (Weather Alert Rain Update). ऐन हिवाळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरु आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे (Weather Alert Rain Update).
दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. त्यामुळे आज आणि उद्या 9 जानेवारीला राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी (7 जानेवारी) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पावसाळी वातावरणामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे.
12.40 night updates.
IMD WRF model guidance for RF on 8 Jan indicates,there could be continued of RF activity ovr parts of Maharashtra likely towards N Madhya Mah, adjoining Marathwada & parts of Konkan.
Mumbai Thane cloudy sky with likely light/mod ?.
TC for change of weather. pic.twitter.com/geFwID6wGO— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 7, 2021
गुरुवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. शहापूरमध्येही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. शहापूरमध्ये सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटाने जोरदार वाऱ्यासह अचानक पावसाने हजेरी लावली. यामुळे वीट भट्टी आणि लागवड केलेल्या भाजीपाल्यावरसुद्धा अवकाळी पावसाने परिणाम झाला आहे.इतकंच नाही तर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक संथ गतीने सुरु होती.
अवकाळी पावसानं आंबा व्यवसायीक धास्तावले आहेत. या अवकाळी पावसानं आंबा हंगाम लाबण्याची शक्यता वर्तवली जाते.
मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असतानाही राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊ शकले नाही. कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे (Weather Alert Rain Update).
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात 8 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 ते 9 जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, 8 जानेवारीला नाशिक, औरंगाबाद, 8 आणि 9 जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर 8 आणि 9 जानेवारीला उत्तर महाराष्ट्र मध्ये, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Raining In Winter | हिवाळ्यात पाऊस का पडतो? जाणून घ्याhttps://t.co/fWeDwxoKeM#RainInDelhi #DelhiRains #RainUpdate #Monsoon #WeatherUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 3, 2021
Weather Alert Rain Update
संबंधित बातम्या:
Weather Alert | राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी, काढणीला आलेल्या पिकांवर संकट
weather alert | पश्चिमी वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण, मुंबईत पावसाच्या हलक्या सरी
Weather Alert | एकीकडे हाडं फोडणारी थंडी, त्यात पावसाळ्यासारखा मुसळधार, महाराष्ट्रात काय होणार?