येत्या 48 तासांत या जिल्ह्यात थंडीची लाट, हवामान खात्याचा इशारा

| Updated on: Jan 09, 2023 | 5:37 PM

देशाच्या उत्तरेकडील राज्यात थंडीची तीव्र लाट पसरली आहे. दिल्लीचे तापमान सोमवारी 1 डिग्री सेल्सिअस होते. त्यामुळे राजधानी दिल्लीत 8 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या शाळांना आता आणखी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

येत्या 48 तासांत या जिल्ह्यात थंडीची लाट, हवामान खात्याचा इशारा
cold_wave
Image Credit source: cold_wave
Follow us on

मुंबई : उत्तरेकडील राज्यात तापमानाने ( Temperature ) किमान पातळी गाठल्याने थंडीचा कहर ( cold wave) असताना विशेषत : राजधानी दिल्ली ( delhi ) थंडीने गारठून गेल्याने शाळा बंद ठेवण्याची नौबत आली आहे. तर महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा वेध शाळेने दिला आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट ते तीव्र शीतलहरेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यात पारा चांगलाच घसरला आहे. कमाल तापमानात घट झाल्यामुळे हुहहुडी चांगलीच वाढली आहे. मुंबईत मात्र किमान तापमान  22 इतके नोंद झाले आहे. दोन आठवड्यापूर्वी कुलाब्यात यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाच्याखाली गेले होते.  मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यात थंडीची तीव्र लाट पसरली आहे. दिल्लीचे तापमान सोमवारी 1 डिग्री सेल्सिअस होते. त्यामुळे 7 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या शाळांना आता आणखी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यातच आपल्या महाराष्ट्रालाही उत्तरेकडील लाटेचा त्रास जाणवत आहे.

महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट ते तीव्र शीतलहरेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पुणे,अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाटेची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद विदर्भातील काही भागात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.