मुंबई : माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, पैठणीतील भाजपचे नेते बद्रीनारायण भुमरे, जिल्हा परिषद पंचायत समिचीचे सदस्य यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेमध्ये जास्तीत जास्त नेते शिवसेनेत येत आहेत. गंगापूर, वैजापूर आणि पैठण या तीन विधासभेतून नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. औरंगाबादमधून शिवसेनेला पाठिंबा मिळत आहे. काही केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री हे काळी काळा काळचं असतील. लोकं लवकरच त्यांना घरी बसवतील, असा टोला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावला.
नितेश राणे हे साताऱ्यातील सभेत बोलताना धमक्या देत होते. पोलीस ठाण्यात जाऊन ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही ते आक्षेपार्ह विधान करत होते.
यावर अंबादास दानवे म्हणाले,नितेश राणे यांच्याबद्दल विशेष काही बोलण्याची गरज नाही. तो कोणाविषयी काहीही बोलत असतो. नितेश राणे यांच्या बोलण्याकडं सिरीअसली घेण्याची गरज नाही. सूर्यावर थुंकल्यानं काही फरक पडतो का, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.
हा मोर्चा अतिशय विराट होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. अजित पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांचेही नेतृत्व या मोर्चाला मिळणार आहे. महाराष्ट्र द्रोहींच्या विरोधातील रोष व्यक्त केला जाणार आहे.
महापुरुषांवर आक्षेपार्ह विधानं करतात. प्रकल्प राज्याबाहेर जाऊनही शांत राहतात. माता भगिनींवर अन्याय करतात. अतिशय चुकीचे शब्द वापरणाऱ्यांचे समर्थन करतात. या सर्व गोष्टींविरोधात हा मोर्चा आहे.
सीमाप्रश्नावर अंबादास दानवे म्हणतात, दोन्ही सभागृहात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सर्व पक्ष एकत्र येतील. सीमाभागातील बांधवांसोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे, असंही ते म्हणाले.