मुंबई : गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेले. त्यानंतर काँग्रेसचे संजय निरुपम यांनी दंड थोपाटलंय. गजानन किर्तीकर यांनी राजीनामा देण्याची मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी संजय निरुपम यांनी आतापासूनंच सुरुवात केली आहे.
संजय निरुपम यांना मी हरविलं. आता त्यांच्या सांगण्यानं मी राजीनामा देणार नाही, असं किर्तीकर म्हणाले. २०२४ ला संजय निरुपम यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी. मी पावणेतीन नव्हे पावणेचार लाखांनी हरविणार, असही किर्तीकर म्हणाले.
संजय निरुपम म्हणाले, २०२४ मध्ये गजानन किर्तीकर कुठं राहणार. ते निवडणूक लढणार की, नाही हाच प्रश्न आहे. ज्या पक्षात आहेत, तो पक्ष त्यांनी निवडणुकीत उतरविणार का. निवडून आल्यापासून गजानन किर्तीकर मतदारसंघात फिरकलेचं नसल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला. किर्तीकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, बाईक रॅली निघण्यापूर्वीचं संजय निरुपम यांना ताब्यात घेण्यात आलं.
मला घरातून उचलून आणण्यात आलं. माझ्याशी असभ्य वर्तणूक करण्यात आली. एसीपीला तत्काळ निलंबित करा, अशी मागणीही संजय निरुपम यांनी केली. निरुपमांकडून किर्तीकर यांचा उल्लेख निकम्मा असा करण्यात आला.
किर्तीकर आणि निरुपम हे एकाकाळी शिवसेनेत होते. किर्तीकर चार वेळा आमदार,पर्यटन राज्यमंत्री आणि दोन वेळा खासदार झाले. तर संजय निरुपम हे दोन वेळा राज्यसभा खासदार झाले.