मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात मागच्या दोन-चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. तलाव, नदी, नाले, धरणं दुथडी भरुन वाहू लागली आहेत. या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. पण आता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरण सुद्धा भरुन वाहू लागली आहेत. देशाच अर्थकारण मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. त्याने सर्वांचीच चिंता वाढलेली. आता जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक सुखावले आहेत.
मुंबईला किती धरणातून पाणी पुरवठा होतो?
शेतकरी वर्गाप्रमाणेच शहरात राहणाऱ्या नागरिकांची चिंताही पावसाने वाढवली होती. कारण धरण क्षेत्रात चांगला पाऊस होणं गरजेच आहे. अन्यथा शहारतील नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागतो. संपूर्ण मुंबईला एकूण सात धरणातून पाणी पुरवठा होतो. तानसा, मोडक सागर, तुलसी, विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो.
मुंबईला पाणी पुरवठा करणारं दुसर धरण कुठलं भरणार?
सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव 100 टक्के भरला आहे. लवकर दुसरा तलाव तानसा भरुन वाहण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने पाऊस सुरु आहे. पावसामुळे धरण भरून वाहण्याची शक्यता आहे.
The collective water stock in the seven reservoirs across Mumbai is now approx. 43% or sufficient for around 115 days.
Tansa: ~78%
Modak-Sagar: ~68.5%
Middle-Vaitarna: ~53%
Upper-Vaitarani: ~17%
Bhatsa: ~35%
Vihar: ~68%
Tulsi: 100%Water cuts on until water stock reaches 75% pic.twitter.com/HL9wnR0FqU
— Mumbai Lakes (@MumbaiLakes) July 21, 2023
सध्या किती आहे पाणी पातळी?
तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी 126.602 मीटर टीएसडीहून जास्त झाली आहे.
लवकरच धरण ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, अशी सूचनाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आल्या आहेत