खोपोलीचा अपघात का झाला? जखमी प्रवाशानं मोठं कारण सांगितलं, मुख्यमंत्र्यांची भेट, 12 मृत्यू, 28 जखमी एक Missing!

| Updated on: Apr 15, 2023 | 1:22 PM

आज पहाटेच झालेल्या भीषण अपघातात मोठी माहिती समोर आली आहे. ४२ प्रवाशांना घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली बस दरीत का कोसळली, याचं कारण उघड झालंय..

खोपोलीचा अपघात का झाला? जखमी प्रवाशानं मोठं कारण सांगितलं, मुख्यमंत्र्यांची भेट, 12 मृत्यू, 28 जखमी एक Missing!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्याला हादरवून सोडणाऱ्या खोपोली अपघाताबाबत (Khopoli Accident) मोठी अपडेट समोर आली आहे. आज पहाटेच घडलेल्या भीषण बस दुर्घटनेत आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसा,  12 जणांचा मृत्यू झालाय तर 28 जण जखमी आहेत. बसमधील जखमी प्रवाशांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेट दिले. या प्रवाशांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेतील जखमी आणि मृतांची ओळख पटली असून अजूनही एकजण मिसिंग आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी जखमी प्रवाशांची काळजीपूर्वक विचारपूस केली. या चर्चेतून अपघातामागे नेमकं काय कारण आहे, हे समोर आलंय.

नेमकं कारण काय?

सकाळी 4 वाजता पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या बसला अपघात कसा झाला, यावरून बोलताना एका प्रवाशाने सांगितले. सकाळपासूनच ड्रायव्हर गाडी भरधाव वेगाने चालवत होता. बसचा हा वेग पाहून प्रवाशांमध्ये खळबळ माजली होती. त्यातील काही प्रवाशांनी ड्रायव्हरच्या केबिनकडे धाव घेतली. त्याला गाडी हळू चालवायला सांगितलं. एकदा नाही तर दोन वेळाला ड्रायव्हरला ही सूचना करण्यात आली. गाडी वेगाने चालवू नको. लहान मुले, महिला आहेत, असं सांगितलं. तरीही त्याने ऐकलं नाही, त्यामुळे हा अपघात झाला. मुख्यमंत्र्यांशी बोलताना एका प्रवाशाने ही आपबिती सांगितली. अशा अपघातांची कारणमीमांसा करणार. असे अपघात घडू नये, यासाठी उपाय योजना करता येतील, का यावर विचार केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कसा घडला अपघात?

पुण्याहून मुंबईच्या दिशेने ही खासगी बस निघाली होती. पहाटे ४ वाजेच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे येताच चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे बस 500 फूट दरीत कोसळली. उंचावरून कोसळल्याने बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. या बसमध्ये 42 प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे.

आर्थिक मदत जाहीर

सदर अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर पूर्ण उपचार होईपर्यंतचा खर्च राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.

अपघातातील मृतांची नावं

१) जुई दिपक सावंत, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुबई

२) यश सुभाष यादव

३) कुमार. विर कमलेश मांडवकर, वय ६ वर्ष

४) कुमारी.वैभवी साबळे, वय १५ वर्ष

५) स्वप्नील श्रीधर धुमाळ वय १६ वर्ष

६) सतिश श्रीधर धुमाळ, वय २५ वर्ष

७) मनीष राठोड, वय २५ वर्ष,

८) कृतिक लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई

९) राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई.

१०) हर्षदा परदेशी, वय १९ वर्ष, माहीम,मुंबई.

११) अभय विजय साबळे, वय २० वर्ष,मालाड,मुंबई.

१२) एक मयत ओळख पटलेली नाही.

एमजीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या जखमींची नावे

1)आशिष विजय गुरव, (वय 19 वर्षे, दहिसर मुंबई)

2) यश अनंत संकपाळ, (वय 17 वर्ष, गोरेगाव, मुंबई)

3) जयेश तुकाराम नरळकर,( वय 24 वर्षे, कांदिवली, मुंबई)

4) वृषभ रवींद्र कोरमे, (वय 14 वर्षे, गोरेगाव, मुंबई)

5) रुचिका सुनील डुमणे, (वय 17 वर्षे, गोरेगाव, मुंबई)

6) आशिष विजय गुरव, (वय १९ वर्ष, दहिसर, मुंबई)

7)ओंकार जितेंद्र पवार, (वय 25 वर्षे खोपोली, रायगड)

8)संकेत चौधरी, ( वय 40 वर्ष,गोरेगाव, मुंबई)

9)रोशन शेलार, (वय 35 वर्ष, मुंबई)

10)विशाल अशोक विश्वकर्मा, (वय 23 वर्ष, गोरेगाव, मुंबई

11) निखिल संजय पारकर, (वय 18 वर्ष, मुंबई)

12) युसुफ मुनीर खान, (वय 13 वर्ष, मुंबई )

13) कोमल बाळकृष्ण चिले, (वय 15 वर्ष, सांताक्रुज, मुंबई)

14) अभिजीत दत्तात्रेय जोशी (वय 20 वर्षे, गोरेगाव मुंबई)

16) मोहक दिलीप सालप, (वय 18 वर्षे, मुंबई)

17) दीपक विश्वकर्मा, (वय २०वर्ष, गोरेगाव, मुंबई)

18) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम, (वय १८ वर्ष, गोरेगाव,मुंबई)

खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमधील जखमींची नावे

१) नम्रता रघुनाथ गावनुक, (वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई)

२) चंद्रकांत महादेव गुडेकर, (वय 29 वर्ष, गोरेगाव, मुंबई)

३) तुषार चंद्रकांत गावडे, (वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई)

४) हर्ष अर्जुन फाळके, (वय 19 वर्ष, विरार)

५) महेश हिरामण म्हात्रे, (वय २० वर्षे, गोरेगाव, मुंबई)

६) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, (वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई)

७) शुभम सुभाष गुडेकर, (वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई )

८)ओम मनीष कदम, (वय १८, गोरेगाव, मुंबई)

९) मुसेफ मोईन खान, (वय २१ वर्ष, गोरेगाव, मुंबई)

खाजगी रुग्णालय जाकोटिया रुग्णालयतील जखमी

१) सनी ओमप्रकाश राघव, (वय २१, खोपोली,रायगड)