पंडित नेहरुंवर टीका करण्याचं कारण काय?, सुप्रिया सुळे यांनी सांगितलं

| Updated on: Oct 28, 2022 | 9:50 PM

महिला क्रिकेटपटूंना जर मानधन चांगलं दिलं असेल तर त्याचा स्वागत आहे.

पंडित नेहरुंवर टीका करण्याचं कारण काय?, सुप्रिया सुळे यांनी सांगितलं
सुप्रिया सुळे यांनी यादीच सांगितली
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे असंवेदनशील सरकार आहे. बांधावर घेत जात आढावा घेतला पाहिजे. मेळावा सण साजरे करण्यासाठी सरकार आहे का, शेतकरी वर्गासाठी आढावा घेत का नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला. राज्यात अनेक ठिकाणी ओला दुष्काळ परिस्थिती आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा. थोडा वेळ मिळाला तर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे.

विषय रिझर्व्ह बँकेचा आहे. त्यात आमचे मत रिझर्व्ह बँकनं मागितले नाही. अरुण जेटली या विषयावर नेहमी म्हणायची की या विषयावरती चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे चर्चा न केलेलीच बरी.

महिला क्रिकेटपटूंना जर मानधन चांगलं दिलं असेल तर त्याचा स्वागत आहे. हा निर्णय चांगला आहे. बीसीसीआय स्वायत्त संस्था आहे. निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे.

कोणास किती निधी मिळाला याचे लोकप्रतिनिधी यांनी आढावा घ्यायला पाहिजे. म्हणून प्रत्येक जण आपलं काम करत असतो. निधी मिळवणं त्यांचं काम आहे. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाले.

बच्चू कडू खूप संवेदनशील आहेत. त्यांचे विधान काय म्हटले ते मी ऐकलं नाही. पण ज्या पद्धतीने चर्चा आहे अख्या गावामध्ये चर्चा आहे की हे खोके सरकार आहे. 50 कोटी मिळून ही सरकार सत्तेवर आले. त्यामुळेच त्यांची जर बदनामी होत असेल तर त्याची उत्तर दिली गेली पाहिजेत, असं मला वाटतं.

नेहरून सारखं वैज्ञानिक दृष्टिकोन कोणाचाही नव्हता. त्यांनी देशाच्या प्रगतीचा विचार करून अनेक संस्था नावारूपास आणल्या. त्यामध्ये आयआयटी असेल आयपीएस अकॅडमी असेल भारतीय लष्कर असेल. या सर्वांमधून भारताची प्रगती झाली. आता मोदींना दुसरा मुद्दा काही हाताशी नाही. त्यामुळे नेहरूंवरती ते टीका करत आहेत, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी लावला.