भाजपने कोणकोणते नरेटिव्ह सेट केले?; उद्धव ठाकरे यांनी यादीच वाचली

| Updated on: Jun 15, 2024 | 4:22 PM

भाजपने लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर गंभीर आरोप विरोधकांवरल केला. भाजप संविधानामध्ये बदल करणार असल्याचं विरोधकांनी नरेटिव्ह सेट करणार असल्याचं म्हटलं होतं. याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

भाजपने कोणकोणते नरेटिव्ह सेट केले?; उद्धव ठाकरे यांनी यादीच वाचली
Follow us on

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळवता आलं नाही. भाजपने विरोधकांवर संविधान बदलणार असल्याचं चुकीचा नरेटिव्ह सेट केल्याचा आरोप केला आणि याचाच फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसल्याचं सांगितंल. यावर महाविकास आघाडीमधील उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना भाजपने कोणकोणते नरेटिव्ह सेट केले यांची वादी वाचून दाखवली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

इंडिया आघाडीला मते दिलं तर तुमची संपत्ती मुस्लिमांना देतील, हे नरेटिव्ह होतं. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या शेतातील म्हैस चोरून नेतील. यांचं सरकार आलं तर नळ कापून नेतील, मंगळसूत्र हे खरं नरेटिव्ह होतं. मी सत्तेत आल्यावर उद्योगधंदे वाढवेन, हा नरेटिव्ह नव्हता का. नकली संतान हे नरेटीव्ह नव्हतं का? असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

वोट जिहाद म्हणजे काय? मोदी म्हणतात त्यांचे बालपण मुस्लिम कुटुंबात गेलं. ईदमध्ये शेजारच्या मुस्लिम कुटुंबाच्या घरात ताजिया खायचे. त्या खालेल्या मीठाला ते जागले की नाही. मोदींनी सांगावं त्या मिठाला जागले की नाही. व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये मीठ टाकतात. तेही जेवण ते जेवले की नाही ते सांगावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी 22 जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो. 23 जानेवारी रोजी नाशिकमध्ये म्हटलं भाजप मुक्त राम पाहिजे. अयोध्येत आणि नाशिकमध्ये भाजपमुक्त राम झाला आहे. जिथे जिथे राम आहे. तिथे भाजपचा पराभव झालाय. भाजपमुक्त राम झाला आहे. त्यांना समजायला पाहिजे होतं. संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं. कसंबसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलं. किती दिवस सरकार राहील सांगता येत नाही. गुजरातबाबत चालुगिरी करायला लागले, तर त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल. नरेटिव्ह म्हणता, ते एका बाजूला आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता. तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचं चित्र अधिक चांगलं राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.