मुंबई : दंगली घडू नये म्हणून मी बोलतोय. सध्याच्या परिस्थितीवर बोलणं कुठे चुकलं. असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. मला कुणाकडूनही हिंदी असण्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असंही ते म्हणाले. तसेच माझ्या वक्तव्यातून कुणालाही बदनाम करण्याचा प्रयत्न नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं. जितेंद्र आव्हाड म्हणाले, दोन्ही गट बाजूला निघून जायचे. हे मी सगळं अनुभवलं आहे. त्यामुळे हे काय घडतंय हे माझ्यापेक्षा जास्त कुणाला कळूच शकत नाही. बोललं नाही तर महाराष्ट्राला कळणार नाही.
या जगात मृत्यूपेक्षा ज्यास्त किंमत आहे का?. लढायला निघालो तेव्हा बोलायचं. चुका असल्या तर त्या दाखवायच्या. त्यात धर्म, जात, प्रांत याचा विचार करायचा नसतो. माझं काय होईल ते होईल. यापूर्वी मी दोन दिवस जेलमध्ये काढलेच आहेत.
रामनवमी आणि हनुमान जयंती हे कार्यक्रम संवेदनांनी केले जायचे. रामाचा पाळणा हलणं. त्या पाळण्यात छोटासा राम असणं. बाल राम. त्यातील ती पूजा. हे सर्व आम्ही आमच्या घरात अनुभवलं आहे. माहौल ऐसा किया जाता है की ये उत्सव दंगो के लिए ही है. यात बदनाम कोण होतो. हिंदू बदनाम होतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटलं.
मी कट्टर हिंदू आहे. मी वसुधैव कुटुंबकम मानणारा हिंदू आहे. राम आपल्या वडिलांचं ऐकणारा होता. आईचं ऐकणारा राम होता. भावाला सन्मानित करणारा राम होता. तो राम आम्हाला माहीत आहे. समाजात एकता, समता, बंधुत्व मानणारा राम आहे. समाजात एकता ठेवणे शिका. समाजात द्वेष पसरवल्याने देशाचे नुकसान होते.
मला कोणत्याही हिंदूचे प्रमाणपत्र नको. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला त्यांनी मला प्रमाणपत्र दिले आहे. गेल्या वर्षीचा रामजन्मोत्सव बघा. त्यापूर्वीचा रामजन्मोत्सव बघा. असा माहौल नव्हता. पुढं काही होणार असेल तर समाजाला अलर्ट करणे ही माझी जबाबदारी आहे.
गेल्यावर्षी रमजानमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. समाजात माहौल खराब होत असेल तर बोलावं लागेल की माहौल डिसटर्ब होतो. देशात काय काय होतो ते बघा. त्यानंतर अंदाज लावा काय काय होणार आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले.