मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : एका बुजुर्ग प्रवाशाला व्हीलचेअर न पुरविल्याने त्याचा अतिश्रमाने हार्टॲटॅक येऊन मृत्यू झाल्याची घटना मुंबई विमानतळावर घडली होती. या प्रकरणात झालेल्या चौकशीनंतर डीजीसीएने एअरलाईन सीएआरचे पालन न केल्याने या एअर इंडिया कंपनीला दोषी ठरवित 30 लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. एअर इंडिया कंपनीच्या विमानातील प्रवाशाबाबत घडलेली ही घटना 12 फेब्रुवारीची आहे. या प्रकरणातील बुजुर्ग दाम्पत्याला व्हील चेअर न पुरविल्याने एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
डीजीसीएने एअर इंडीयाला 30 लाखांचा दंड ठोठावला आहे. टाटा ग्रुपची एअरलाईन कंपनी एअर इंडियाला मोठा फटका बसला आहे. 12 फेब्रुवारीला एका प्रवाशाला व्हीअचेअर न पुरविल्याने या प्रवाशाचा मृत्यू झाला होता. फ्लाईटमध्ये एक 80 वर्षीय प्रवासी त्याच्या पत्नीसह प्रवास करीत होता. मुंबईत लॅंड झाल्यानंतर प्रवाशाने क्रुला व्हीलचेअर मागितली होती. एकच व्हीलचेअर असल्याने त्याच्या पत्नीला व्हीलचेअर देण्यात आली. हा प्रवासी स्वत: चालत दीड किमी अंतर पार करीत असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रवाशांनी विमानात देखील व्हीलचेअरची नोंदणी केली होती. बुजुर्गाची पत्नी देखील व्हीलचेअरवर प्रवास करीत होती. परंतू विमानतळावर व्हीलचेअरची तुटवडा असल्याने या बुजुर्गाला व्हील चेअर उपलब्ध झाली नाही. खूप अंतर चालत गेल्याने त्याला चक्कर आली आणि तो कोसळला. या संदर्भात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या नागरी विमान उड्डयन महासंचालनालयाने ( ) कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर टाटा एअरलाईन कंपनीने 20 फेब्रुवारीला त्यास उत्तर पाठविले. त्यात कंपनीने प्रवासी दुसऱ्या व्हील चेअरची वाट पाहण्याऐवजी पत्नीसोबत चालत गेल्याचा दावा केला.