दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल चढवला. विरोधकांवर दडपशाहीचा प्रयोग सुरु असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दुसऱ्या दिवशी पण केंद्र सरकारसह भाजपवर तोफ डागली. अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर आणि बदल्याच्या भावना आणि घाबरून खोट्या केस मध्ये अटक केली हे सर्व जण जाणत आहेत विश्वगुरू देखील जाणतात, असा टोला त्यांनी हाणला.
कंस मामाला भीती
दिवसेन दिवस सत्तादाऱ्यांना भीती वाटत आहे. देशात सध्या जंगल राज सुरू आहे. जसे पुतीन आणि चायना मध्ये सुरू आहे तसे इथे देखील सुरू आहे. केजरीवाल यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. दिल्लीत भाजप 5 जागांच्यावर आले नाही. केजरीवाल जेलमध्ये राहून देखील काम करू शकतात. केजरीवाल यांना लोकांनी निवडून आणले ईडी सीबीआय यांनी नाही. कंसाला ज्याला ज्याची भीती होती त्यांनी सर्वांना तुरुंगात टाकले. देवाला देखील तुरुंगात टाकले होते. श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि कंसाचा वध केला.कंस मामाला भीती वाटत आहे या सर्वांची त्यामुळे तुरुंगात टाकत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारवर केला.
तर बघा कोण कोण तुरुंगात जाईल
ज्यांनी फंडिंग केली त्यांना तुरुंगात टाकण्यात येत नाही. लिकर घोटाळा फंडिंग भाजपला मिळाला आहे. त्यामुळे कोणाला जेलमध्ये जावे लागणार. केजरीवाल यांना जेल मध्ये न जाता भाजप अध्यक्षांना ईडीने जेलमध्ये टाकावे. ईडीने चुकीचं काम केलं तर आमचं सरकार आल्यानंतर बघा कोण जेलमध्ये जातंय, असा इशारा पण त्यांनी दिला.
पंतप्रधानांच्या घराला घेराव
पंतप्रधानांविरोधात आपच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्याधिक रोष असल्याचे दिसून आले. भाजप दमनशाही, दडपशाहीचा वापर करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. 24 मार्च मार्च रोजी आंदोलन अजून तीव्र करण्यात येणार आहे. 25 मार्च रोजी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 26 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यात येणार असल्याचे गोपाल राय यांनी स्पष्ट केले.