Ratan Tata : बॉस असा असावा, जेव्हा कर्मचाऱ्याला वाचविण्यासाठी विमान उड्डाण करायला निघाले होते रतन टाटा

| Updated on: Oct 10, 2024 | 8:37 PM

रतन टाटा यांनी कायम त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली. त्यांनी कधीही कर्मचाऱ्यांना कसली कमी जाणवू दिली नाही. त्यांच्या मृत्यूने एका चांगल्या दीलदार बॉसला कर्मचाऱ्यांनी गमावले आहे.

Ratan Tata : बॉस असा असावा, जेव्हा कर्मचाऱ्याला वाचविण्यासाठी विमान उड्डाण करायला निघाले होते रतन टाटा
Follow us on

भारताचे थोर उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्याने उद्योगजगाताचे नव्हे तर देशाचे नुकसान झाले आहे. त्यांनी मुंबईतील ब्रिच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु असताना वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालविली. ते साल 1991 ते 2012 पर्यंत टाटा ग्रुपचे चेअरमन होते. रतन टाटा केवळ चांगले उद्योगपती नव्हे तर एक चांगले माणूसही होते. त्यांनी कर्मचाऱ्यांवर खूप प्रेम केले. त्यांना कसली तक्रार होऊ दिली नाही. त्यांच्या कर्मचारी प्रेमाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. ते पुण्यातील एका आजारी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या घरी पोहचले होते. एकदा तर एका कर्मचाऱ्याचा जीव वाचविण्यासाठी ते विमान उडविण्यासाठी देखील तयार झाले होते.

ही घटना साल 2004 च्या ऑगस्ट महिन्यातील आहे. पुण्याती टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश एम. तेलंग यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांना तातडीने मुंबईतील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. तो दिवस रविवारचा होता. त्यामुळे डॉक्टरांनी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यास असमर्थता दाखवली. ही बाब रतन टाटा यांना कळाली. तेव्हा ते स्वत: विमान उडविण्यासाठी तयार झाले. रतन टाटा यांच्या विमान उड्डाणाचे लायसन्स होते.

अखेर व्यवस्था झाली

परंतू रतन टाटा यांना विमान उडविण्याची गरज पडली नाही. कारण एका एअर एम्ब्युलन्सी व्यवस्था झाली आणि प्रकाश तेलंग यांना हवाईमार्गे मुंबईतील ब्रिच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये स्थलांतरीत करण्यात यश आले. त्यानंतर त्यांच्यावर सफल उपचार करण्यात आले. रतन टाटा हे प्रशिक्षित पायलट होते. त्यांच्या जवळ विमान उडविण्याचे लायसन्स होते. त्यांच्याकडे डसॉल्ट फाल्कन 2000 प्रायव्हेट जेट देखील होते. ज्याची किंमत सुमारे 150 कोटी रुपये होती.