मुंबई :उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. प्रत्येकाला वाटतं की, मदत आपल्यापर्यंत पोहचावी. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ओरडत होतो की, ओला दुष्काळ जाहीर करा. आतापण ओला दुष्काळ अशी परिस्थिती झाली आहे. अनेकदा सरकारकडून फक्त घोषणा झाल्या आहेत. पण, त्याची पूर्तता झाली नाही. उद्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बांधावर जाणार आहेत. शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.
पुण्यात पाऊस आला. नुकसान झालं. शहरी तसेच ग्रामीण भागात नुकसान झालंय. हे वाढत चाललं आहे. लाँगटर्म पाऊल उचलली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मदतीला गेलं पाहिजे. त्यांना धीर देणं गरजेच आहे. आमचं कर्तुत्व सिद्ध केलं पाहिजे. एकामेकांवर टीका सुरू झाली आहे.
अनेक राज्यातून मुख्यमंत्री येतात. चांगल्या योजना सांगतात. हे करत असताना काही उद्योगपण घेऊन जातात. आपले मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात गेलेले दिसत नाहीत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या काळात मी, सुभाष देसाई आणि नितीन राऊत हे डाओसला गेलो. 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. त्यानंतर सरकार पाडलं गेलं. वेदांता फॉक्सकॉन, मेडिकल डिव्हाईस पार्क हे आपल्या राज्यातून गेलेत.
आपले खरे मुख्यमंत्री रात्री बारा वाजता मंडळांना भेटी देतात. पण, दुसऱ्या राज्यात गुंतवणूक आणण्याच्या दृष्टिकोनातून कुठं जाताना दिसत नाहीत, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.