मुंबई : अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभाग घेतला. सुमारे ४० आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जातो. त्यामुळे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडे कमी आमदार झालेत. तुलनेत काँग्रेसचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला.
काँग्रेस उद्या विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर करणार आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या सुरू होत आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांची नावे सध्या विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत आहेत. उद्या यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. तत्पूर्वी अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वाधिक आमदार असलेला पक्ष हा काँग्रेस झाला. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे. त्याला महाविकास आघाडीने सम्मती दिली आहे.
उद्यापासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. सर्वाधिक विरोधी पक्षाचे सदस्य आमच्याकडे असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेतेपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे उद्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीतील पक्ष कार्यालयात यासंदर्भात बैठक पार पडली होती. पक्षश्रेष्ठींकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. काँग्रेसचे नेतृत्व काय निर्णय घेते हे पाहावं लागेल.