मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 8 हजार 623 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे 51 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Which Maharashtra district imposed Curfew)
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नवे कोरोना हॉटस्पॉट तयार होत आहेत. यात अमरावीत, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्येही आता कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
अमरावतीत 7 दिवस संचारबंदी
अमरावती जिल्ह्यात 7 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावती, अचलपूर ,अंजनगाव सूर्जी शहर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या तिन्ही शहरात 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ तशीच राहणार आहे. तसेच नंतरची स्थिती पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचंही प्रशासनानं सांगितलं आहे.
अमरावतीत 22 फेब्रुवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी होता. या लॉकडाऊनची मुदत संपत आल्यानंतर पुन्हा एकदा अमरावतीत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यानुसार येत्या 1 मार्चपासून 8 मार्चपर्यंत अमरावतीत लॉकडाऊन असणार आहे.
राज्यातील आजचा कोरोना रुग्णांचा आकडा
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 3 हजार 648 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
गेल्या 24 तासात 51 जणांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांचा आकडा 21 लाख 46 हजार 777 वर
आतापर्यंत कोरोनामुळे 52 हजार 92 जणांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत एकूण 20 लाख 20 हजार 951 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. (Which Maharashtra district imposed Curfew)
संबंधित बातम्या :
धोका वाढला! राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 नवे रुग्ण सापडले
कोरोना रोखण्यासाठी रिटायर्ड आर्मी मैदानात; सांगली महापालिकेचा अनोखा फंडा
वर्षभर कोरोनाविरुद्ध लढलो, आता पुन्हा लढाईचे दिवस- पोलीस महासंचालक