Video: Tv9 स्पेशल रिपोर्ट | संदीप देशपांडे यांच्यावर कोणत्या पक्षाने हल्ला केला? मुंबई पोलिसांनीच केला खुलासा!

| Updated on: Apr 07, 2023 | 2:06 AM

संदीप देशपांडेंवरच्या हल्ल्यामागे ठाकरे गटाचे संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाईंचा हात असल्याचा आरोप मनसेचा होता. मात्र मुंबई पोलिसांनीच खुलासा केला आहे.

Video: Tv9 स्पेशल रिपोर्ट | संदीप देशपांडे यांच्यावर कोणत्या पक्षाने हल्ला केला? मुंबई पोलिसांनीच केला खुलासा!
Follow us on

मुंबई : मनसे नेते संदीप देशापांडेंवर झालेल्या हल्ल्यामागे कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्यांचा हात नव्हता, असं मुंबई पोलिसांनी तपासाअंती म्हटलंय आणि त्यानंतर आता ठाकरे गटानं मनसेच्या आरोपांवर प्रश्न उभे केले आहेत. संदीप देशपांडेंवरच्या हल्ल्यामागे ठाकरे गटाचे संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाईंचा हात असल्याचा आरोप मनसेचा होता. मात्र पोलीस तपासात त्या हल्ल्यामागे कोणताही पक्ष किंवा नेत्याचा समावेश नसल्याचं निष्पन्न झालंय.

देशपांडेवरच्या हल्ल्यात एकूण 4 लोकांना अटक झाली होती. त्यापैकी अशोक खरात हाच प्रमुख आरोपी होता आणि हल्ल्यानंतरच्या प्रसिद्धीमुळे पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल, या आशेनं अशोक खरातनं हल्ला केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिलीय. दरम्यान आरोपी फक्त स्वतःच्या जोरावर आपल्यावर हल्ला करु शकत नाही, असं म्हणतं संदीप देशपांडेंनी पोलीस तपासावर प्रश्न उभा केलाय.

३ मार्चला संदीप देशपांडे शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला गेले होते. एरव्ही त्यांच्यासोबत दोन-चार मित्र असायचे. पण ३ मार्चला ते एकटेच पार्कात आले. ती संधी साधून देशपांडेंवर हल्लेखोरांनी स्टम्प आणि रॉडच्या सहाय्यानं हल्ला केला. यानंतर नितेश राणे आणि मनसे नेते अमेय खोपकरांनी हल्ल्यामागे ठाकरे गटाकडे बोट दाखवलं होतं

हल्ल्यानंतर खुद्द राज ठाकरेंनी सुद्धा नाव न घेता हल्लेखोरांमागे जे आहेत, त्यांना उत्तर मिळेल, असा इशारा दिला होता. मात्र पोलीस तपासात हल्ल्याचं नियोजन आरोपीचंच होतं हे निष्पन्न झालंय.