विमान प्रवासात कुठली सिट असते सर्वात सुरक्षित, अभ्यासात आचर्श्चयकारक उत्तर आले

| Updated on: Feb 20, 2023 | 3:28 PM

अलीकडे झालेल्या विमानांच्या काही अपघातांच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासी कोणत्या सिटला सुरक्षित मानतात असा अभ्यास झाला.

विमान प्रवासात कुठली सिट असते सर्वात सुरक्षित, अभ्यासात आचर्श्चयकारक उत्तर आले
AIR
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : हल्लीच्या वेगवान जीवनात आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पोहचायचे असेल तर विमानासारखा सध्या तरी दुसरा पर्याय नाही. विमानाने हजारो किमीचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये करता येत असतो. परंतू काही जणांना विमान प्रवासाची धास्ती असते. त्यामुळे प्रवासी आपल्या इच्छेनूसार आसनांचा क्रमांक निवडत असतात. काही लोकांना यश येते तर काहींना नाही. लोक आपल्या पद्धतीने अमूक तमूक सिट सुरक्षित समजून तिकीट बुक करीत असतात. परंतू अभ्यासकांना काय वाटते…

कोणताही अपघात नशिबाचा भाग असतो. तरीही अलिकडे झालेल्या विमानांच्या काही अपघातांमुळे काही प्रवाशांना विमानाचा प्रवास करताना धास्ती वाटत आहे. त्यामुळे प्रवासी सिट बुक करताना आपल्या धारणेनूसार बुकींग करीत असतात. अनेक प्रवासी विमानातील विंडो सिट पसंत करतात. काहीजण लोक बाथरूम जवळची सिट योग्य मानतात. तर काही जण केबिन क्रु जवळ बसणे पसंद करतात. तरीही लोकांच्या मनात एक प्रश्न कायम असतो की विमानातील सर्वाधिक सुरक्षित सिट कोणती असते.

अलिकडे झालेल्या एका अभ्यासात एक गोष्ट उघडकीस आली आहे. काही लोकांची इच्छा होती की प्रवासात कोणते आसन सर्वात सुरक्षित असते. नेपाळच्या विमान अपघातानंतर लोक थोडे साशंक झाले आहेत. त्यामुळे हा अभ्यास केला गेला आहे. टाईम मॅगझीनच्या मते विमानाची मधले आसन सर्वात सुरक्षित मानले जाते. युएसए फेडरल एव्हीएशन अथोरीटीने केलेल्या 35 वर्षांच्या स्टडीत असे म्हटले आहे की विंडो सिट जास्त सुरक्षित नसते.

स्टडीच्या मते प्लेनमध्ये मधल्या आसनांच्या दोन रांगा सोडून असलेली सिट सर्वात सुरक्षित मानली जाते. फ्रंट सिटवर बसणे थोडे धोकादायक असते. स्टडीत असे उघडकीस आले की पुढच्या भागात विमानाचा पंखा असतो. सन 1985 ते 2020 दरम्यान झालेल्या विमान अपघात आणि मृत्यूचा अभ्यास केला असता. या संस्थेने असा दावा केला आहे की बसण्याची सर्वात वाईट जागा विमानाच्या मध्यभागी असते. केबिनच्या मध्यभागाच्या आसनांवर मृत्यू दर 39 टक्के होता. तर समोरून तिसरी सिट 38 टक्के आणि पाठीमागच्या तिसऱ्या सिटमध्य 32 टक्के मृत्यू दर आढळला.

परंतू वास्तवाचा विचार केला तर लोक लवकर उतरण्यासाठी पुढील आसनांची निवड करीत असतात. न्युझीलंडमध्ये 1979 मध्ये एक विमान अपघात घडला होता. त्यात केबिन क्रु समवेत 257  जणांचा मृत्यू झाला होता. 2009  मध्ये फ्रान्स येथे झालेल्या अपघातात 228 प्रवाशांचा मृत्यू झाला. आपातकाली स्थितीसाठी पायलटाला कठोर प्रशिक्षण दिलेले असते. त्यांना डोंगर, मैदान आणि पाण्यासाठीही विशेष ट्रेनिंग असते. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा यासाठी हे प्रशिक्षण असते.