मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. यानंतर आता त्यांच्यासोबत काम करणारे इतर पोलीस अधिकारीही राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) रडारवर आलेत. सचिन वाझे यांचे निकवर्तीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या एपीआय रियाझ काझी यांची देखील एनआयए सलग दुसऱ्या दिवशी कसून चौकशी करत आहे. त्याचमुळे रियाझ काझी यांच्याविषयी देखील उत्सुकता वाढलीय (Who is API Riyaz Kazi colleague of Sachin Vaze NIA investigating).
कोण आहेत एपीआय रियाझ काझी?
रियाझ काझी हे 2010 च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी 2010 सालच्या 102 व्या बॅचमधील अधिकारी आहेत. पोलीस दलातील काझी यांची सगळ्यात पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पोस्टिंग अँटी चेन स्नॅचिंग विभागात करण्यात आली.
पीएसआयवरून एपीआय पदावर प्रमोशन झाल्यानंतर रियाझ काझी यांची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकात करण्यात आली. 9 जूनला सचिन वाझेंनी सीआययु पथकाचे इंचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून रियाझ काझी हे सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. वाझे यांच्याशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून काझी यांची ओळख आहे.
कंगना-ह्रतिकपासून अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास, अर्णब गोस्वामीला घरातून अटक करण्यातही भूमिका
सीआययु पथकाने केलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात सचिन वाझे यांच्यासोबत एपीआय रियाझ काझी आणि एपीआय होवोळ देखील सहभागी होते. यामध्ये टीआरपी घोटाळ्याचा तपास, डिसी अवंती कार घोटाळा, फेक सोशल मीडिया फॉलोवर्स प्रकरण आणि कंगना हृतिक वाद प्रकरणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक करताना सीआययु युनिटने बजावलेल्या भूमिकेत एपीआय रियाझ काझी यांचाही वाझे यांच्यासोबत सहभाग होता.
स्फोटकं ठेवण्यात वाझेंचा सहभाग असल्याचा एनआयएचा आरोप
अंबानी स्फोटके प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर अंटेलिया इमारतीच्या परिसरात स्फोटके ठेवण्याच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आलाय. याच प्रकरणात वाझेंना अटक करण्यात आलीय. एनआयएने वाझेंविरोधात काही पुरावे हाती लागल्याचा दावा केलाय. सचिन वाझे आरोपी असल्याचं NIA चं म्हणणं आहे. मात्र वाझे यांच्यासोबत काम करणारे सीआययु पथकातील काही अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. यामध्ये एपीआय रियाझ काझी आणि एपीआय होवोल यांचा समावेश आहे.
स्फोटकं ठेवण्यात आलेल्या गाड्यांच्या नंबर प्लेट तयार करण्यात एपीआय काझींचा सहभाग असल्याचा आरोप
ज्या गाड्या गुन्ह्यात वापरण्यात आल्या त्यांच्या नंबरप्लेट्स गुन्ह्याच्या दिवशी वारंवार बदलण्यात आल्या होत्या. या नंबरप्लेट्स बनवून घेण्यात एपीआय रियाझ काझी यांचा सहभाग आहे, असा एनआयएचा दावा आहे. त्याअनुषंगाने त्यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे.
वाझे यांच्या चौकशीत आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या सहकाऱ्यांच्या चौकशीतून काय सत्य बाहेर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
Sachin Vaze Case : पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक
वाझेंची भूमिका उघडी पडते आहे पण काझी आणि API होवाळ का रडारवर? वाचा सविस्तर
पवारसाहेब जाणते राजे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा, भाजपकडून जोर
व्हिडीओ पाहा :
Who is API Riyaz Kazi colleague of Sachin Vaze NIA investigating