Explain : ठरलं, महायुतीचा CM कोण? देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पदाबाबत मोठे संकेत, का येत आहे लालकृष्ण आडवणींची आठवण

| Updated on: Oct 24, 2024 | 9:32 AM

Devendra Fadnavis on Mahayuti CM : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका (Maharashtra Vidhansabha Election 2024) होऊ घातल्या आहेत. पण मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स कायम आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने त्यांचा सीएम पदाचा चेहरा अजूनही घोषित केलेला नाही. पण महायुतीचा CM कोण, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिले आहेत...

Explain : ठरलं, महायुतीचा CM कोण? देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पदाबाबत मोठे संकेत, का येत आहे लालकृष्ण आडवणींची आठवण
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?
Follow us on

राज्यात विधानसभा निवडणुकीची कोण धामधूम सुरू आहे. जागा वाटपाचा खल आता अंतिम टप्प्यात आहेत. अनेक ठिकाणी पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. काही जागा मित्र पक्षांसाठी मन मोठं करण्यात आलं आहे. आता एकदिलानं निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी सुरू झाली आहे. लवकरच सभांचा धडाका सुरू होईल. राज्य पिंजून काढण्यात येईल. पण महायुती आणि महाविकास आघाडीने त्यांचा मुख्यमंत्री पदाचा अधिकृत चेहरा काही घोषित केलेला नाही. त्यातच महायुतीचा CM कोण, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिले आहेत.

महाविकास आघाडीला आव्हान

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचे आव्हान दिले होते. त्यावर महाविकास आघाडीकडूनही महायुतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावे असे आव्हान देण्यात आले. त्यावेळी भाजपच्या नियमाचा दाखला देत, मुख्यमंत्री पदाचा चेहरा देवेंद्र फडणवीस जाहीर करू शकत नाहीत. तर याचा निर्णय विधानसभेतील आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील असे सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या राजकारणात फडणवीस फॅक्टर

राज्याच्या गेल्या पाच वर्षातील राजकारणात फडणवीस फॅक्टर ठळकपणे दिसून आला. महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर अवघ्या दोन वर्षातच त्यांनी शिवसेनेला सुरूंग लावला आणि हे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत त्यांनी महायुती सरकार सत्तेत आणले. त्यापूर्वी अजित पवार यांच्यासोबत त्यांनी शपथविधी केला होता. तोच पॅटर्न राबवत काही दिवसानंतर अजित पवार यांना पण महायुतीत घेतले. त्यावेळी राजकारण्यांनाच नाही तर सर्वसामान्यांना पण जबरदस्त धक्का बसला होता.

आमचा मुख्यमंत्री तर येथेच बसला आहे

महायुतीचा मुख्यमंत्री कोण असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही होते. त्यावेळी कुणाचे ही नाव न घेता, त्यांनी आमचा मुख्यमंत्री तर येथेच बसला असल्याचे खुसखुशीत उत्तर दिले. त्यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले असले तरी या पदाबाबतचे मोठे संकेत दिले आहेत.

काय आहेत मुख्यमंत्री पदाबाबतचे संकेत?

2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून बाहेर पडले, तेव्हा जास्त आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. पक्ष मजबूत करण्यासाठी काही बदल स्वीकारले जातात. संघटन हे सर्वात मोठे असते, असा हा संदेश होता. 2014 ते 2019 या काळात ते मुख्यमंत्री होते. पण त्यानंतर ही त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.

लालकृष्ण आडवाणी यांची आठवण का?

1995 मध्ये मुंबईतील शिवाजी पार्कवर भाजपचे अधिवेशन झाले. त्यात देशभरातली भाजपचे जवळपास एक लाख 20 हजार कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हजर होते. लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने भाजपला विशाल स्वरूप आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वीच मुंबईत हे अधिवेशन झाले होते. त्यावेळी आडवाणी यांनी आक्रमक हिंदुत्व पुढे केले होते. ते दहा वर्षांपासून पक्षाचे अध्यक्ष होते. त्यामुळे निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले तर तेच पंतप्रधान होतील, असा सर्वांचा अंदाज होता. त्याचवेळी आडवाणी यांनी मंचावरून पंतप्रधान पदासाठी अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव जाहीर केले. त्यावेळी सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. सध्या राज्यात भाजपाविरोधात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवले आहे. मराठा समाजाची मोठी नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे सत्ता समीकरणं जुळवण्यासाठी आण पक्ष मजबुतीसाठी काही निर्णय दूरदृष्टीने घ्यायचे असतात हे मुरब्बी नेत्यांना सांगावे लागत नाही.