हेमंत करकरे शहीद कसे झाले? एस. एम. मुश्रीफ यांनी थेट ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेतली

| Updated on: May 06, 2024 | 4:44 PM

"हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाबच्या रायफलमधून उडवलेल्या नव्हत्या. किंवा त्याचा जो इस्माईल नावाचा साथीदार होता त्याच्याही रायफूलमधून उडवलेल्या नव्हत्या, असा स्पष्ट उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला होता", असा दावा एस. एम. मुश्रीफ यांनी केला.

हेमंत करकरे शहीद कसे झाले? एस. एम. मुश्रीफ यांनी थेट त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेतली
एस एम मुश्रीफ यांची Tv9 ला Exclusive प्रतिक्रिया
Follow us on

काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. “हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. तर ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. त्यावेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर ज्येष्ठ सरकारी वकील आणि भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी माजी पोलीस अधिकार एस. एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या ‘हू किल्ड करकरे’ नावाच्या पुस्तकाचा दाखला देत आरोप केला आहे. यानंतर एस. एम. मुश्रीफ यांची स्वत:ची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. एस. एम. मुश्रीफ यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली.

“हू किल्ड करकरे हे पुस्तक 2009 मध्ये प्रकाशित झालं. त्यानंतर त्याच्या बऱ्याच प्रती निघाल्या. प्रती प्रसिद्ध झाल्या. पण नुकतंच उज्ज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर मला वाटतं आपण यावर काहीतरी निवेदन दिले पाहिजे. कारण ते या सगळ्या प्रकरणात सरकारी वकील होते. त्यांची बरीच जबाबदारी होती. एक सत्य लोकांसमोर आणायची जबाबदारी होती. ते सत्य मी या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणलेलं होतं. या पुस्तकात मी मुख्यत्वे दोन मुद्दे मांडले होते”, अशी प्रतिक्रिया एस. एम. मुश्रीफ यांनी दिली.

हेमंत करकरे शहीद कसे झाले?

“गोळ्यांची पद्धत कशी असते, ज्यावेळेस एखाद्याचा बुलेटने मृत्यू होतो त्यावेळेस त्याच्या शरीरातल्या गोळ्या या बॅलेस्टिक एक्सपर्ट म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्टकडे पाठवल्या जातात. ज्या शस्त्रातून बुलेड उडाल्याचा संशय आहे ते शस्त्र पाठवले जातात. ते त्याचं कम्पॅरिसन करतात मग सांगतात की या शस्त्रातून गोळ्या उडवल्या गेल्या की नाहीत. हेमंत करकरे यांच्या शरीरातून ज्या गोळ्या मिळाल्या त्यांचं फॉरेन्सिक विभागाने जे निरीक्षण केलं त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की, हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाबच्या रायफलमधून उडवलेल्या नव्हत्या. किंवा त्याचा जो इस्माईल नावाचा साथीदार होता त्याच्याही रायफूलमधून उडवलेल्या नव्हत्या, असा स्पष्ट उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला होता”, असा दावा एस. एम. मुश्रीफ यांनी केला.

“जजमेंटमध्ये म्हणजेच निकालामध्ये ही गोष्ट स्पष्टपणे नमूद केलेली आहे. त्याच निकालपत्रात पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे हेही नमूद करण्यात आलं आहे की, त्यांना ज्या गोळ्या मारण्यात आल्या आहेत त्या मानेपासून पोटात खाली पाच गोळ्या मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. याचा अर्थ पक्का झाला की, त्यांना पाच गोळ्या रिव्हॉलवरने मारल्या. त्यातील तीन बाहेर निघून गेल्या, दोन आतमध्येच राहिल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असं एस. एम. मुश्रीफ म्हणाले.

मश्रीफ यांचा उज्ज्वल निकम यांच्यावर गंभीर आरोप

“ही बाब उज्ज्वल निकम यांच्या लक्षात आली होती. कारण पोस्टमार्टम रिपोर्ट कागदपत्रात होता. निकालात ही बाब आली होती. उज्ज्वल निकम यांची जबाबदारी होती की, त्यांनी कोर्टाला विनंती करने की, तु्म्ही तपास यंत्रणांना आदेश द्या, ज्या गोळ्यांमुळे हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला त्या कुणी मारल्या याचा तपास करणयाचे आदेश द्या, अशी त्यांची जबाबदारी होती. पण त्यांनी तशी विनंती त्यांनी कोर्टात केलेली नाही. किंवा त्यांनी ही बाब कुठेही रेकॉर्डवर आणली नाही. याचा अर्थ त्यांनी जाणूनबुजून या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.

“आमचं जनरल नॉलेज आहे, या जनरल नॉलेजवरुन प्रभाकर आलोक आणि ज्यांनी वरुन खाली गोळ्या घातल्या ते पोलीस अधिकारी हे दोघेही आरएसएसशी संबंधित आहेत, अशी आम्हाला माहिती मिळाली. याचा अर्थ उज्ज्वल निकम यांनी आरएसएसच्या दोन लोकांना वाचवण्यासाठी, या सर्व हल्ल्यामागील जबाबदार असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीला वाचवलं आणि करकरेंना मारणाऱ्या व्यक्तींना वाचवलं. हे देशद्रोही कृत्य आहे. त्यामुळे प्रभाकर आलोक, संजय गोयीलकर वरुन ज्यांनी गोळ्या मारल्या आहेत ते आणि उज्ज्वल निकम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे”, अशी भूमिका एस एम मुश्रीफ यांनी मांडली.

“ज्यावेळी माझं पुस्तक प्रसिद्ध झालं त्यावेळी बिहारचे आमदार राधाकांत यादव, त्यांचं त्यावेळी वय 77 वर्षे होतं. त्यांनी ते पुस्तक वाचलं. त्यानंतर त्यावेळी ते मला येऊन भेटले. ते म्हटले की, तुम्ही जे म्हणालात ते मला पटलेलं आहे. या गुन्हाचा फेरतपास व्हावा यासाठी जनहित याचिका दाखल करायची आहे. तर मी म्हटलं, ठीक आहे. तुम्हाला जे काही डॉक्यूमेंट्स लागतील ते मी देतो. त्याच्या आधारे त्यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केला. सुरुवातीला ती फक्त रिट पिटीशन होती. पण कोर्टाने स्वत: त्याचं रुपांतर जनहित याचिकेत केलं. ही याचिका दाखल झाल्यावर कोर्टाने ते बघितलं आणि हे बरोबर आहे, याच्या बोलण्यात तथ्य आहे, असं बघितलं. कोर्टाला जोपर्यंत तथ्य आहे असं वाटत नाही तोपर्यंत ते नोटीस काढत नाहीत”, असंदेखील एस एम मुश्रीफ यांनी सांगितलं.