काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे मूळ गाव दरे येथे गेले होते. तिथे मुक्काम ठोकल्यानंतर ते ठाण्यात परतले. त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे अजितदादा दिल्लीत दाखल झाले आहे. ते काही कामानिमित्त दिल्लीत आल्याचे सांगण्यात आले आहे. आज अजितदादा दिल्लीत दाखल झाल्यानंतर माध्यमांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. ते जमलंस तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. त्यावर शिंदे गटातून अशी पहिली प्रतिक्रिया आली आहे. शंभुराज देसाई यांनी याविषयी भाष्य केले आहे.
वर्षावर बैठक होणार
आज सर्व नेते आहेत ते शपथविधी स्थळावरती पाहणी साठी गेलेले आहेत. काल पण काहींनी पाहणी केली आज सर्व एकत्रित येऊन पाहणी करतायेत, आज कदाचित मुख्यमंत्री वर्षावर येऊन सर्वांचे बैठक देखील घेणार आहेत. ते आल्यानंतर आमची त्यांच्याशी भेट होईल त्यानंतर पुढील नियोजन करू. काल बावनकुळे अचानकच पाहणी करण्यासाठी गेले होते त्यांची माझी रात्री भेट झाली तेव्हा त्यांनी मला सांगीतलं की ठरवून झालं. महायुतीचे काहीच नेते पाहणी करायला गेले ना आम्ही गेलो नाही असे छोट्या गोष्टीवरून आमच्या नाराज होणार नाही, महायुती म्हणून एकत्र आम्ही सर्वत्र काम करतोय, अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांनी दिली.
कोणतीही नाराजी नाही
जो महायुती मधील वरिष्ठ नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल… त्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा राहील, असे एकनाथ शिंदे यांनी अगोदरच सांगितलेले आहे. आमच्याकडून कुठेही नाराजी नाही, असे शंभुराज देसाई यांनी सांगीतले. कोणतं खातं कोणाला या चर्चा माध्यमांमध्ये करायच्या नसतात. आमचं खातं कोणाला या माध्यमांमध्ये आणि डिबेट मध्ये चर्चा करून होत नाही. तर नेत्यांमध्ये चर्चा करून होत आहेत. शिवसेनेने सर्वाधिकार हे मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहेत. राष्ट्रवादीने अजित दादांना सर्वाधिकार दिले आहेत. सर्व पक्षातील नेतृत्वाचा विषय आहे की त्यांनी ते ठरवायचं आहे, असे देसाई म्हणाले.
अजित पवारांच्या दिल्लीवारीवर काय प्रतिक्रिया
अजित पवार दिल्लीला गेले याबद्दल दादा अधिक बोलू शकतात. पदांच्या कामासाठी गेलेत की दुसर्या कामासाठी गेलेत हे तुमचे प्रतिनिधी भेटून विचारू शकतात. सुनील तटकरे यांनी सकाळी सांगीतलं दादा त्यांच्या खाजगी भेटीसाठी दिल्लीमध्ये आले आहेत. आणि शक्य झालं तर अमित शाह यांना भेटणार आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दादांच्या दिल्लीवारीवर दिली आहे.