इंडिया आघाडी आणि राहुल गांधींसमोर शरद पवारांनी भाषणामध्ये निवडणूक आयोगाचे का मानले आभार?

| Updated on: Mar 17, 2024 | 8:50 PM

मुंबईमधील शिवाजी पार्कवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारतो जोडो न्याय यात्रेची सांगता होत आहे. इंडिया आघाडीमधील मोठे नेते उपस्थित आहेत. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगाचे आभार मानले.

इंडिया आघाडी आणि राहुल गांधींसमोर शरद पवारांनी भाषणामध्ये निवडणूक आयोगाचे का मानले आभार?
Follow us on

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारता जोडो न्याय यात्रेचा सांगता सभा सुरू आहे. या सभेमध्ये इंडिया आघाडीमधील पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये निवडणूक आयोगाचे आभार मानले. शरद पवार यांनी नेमके कोणत्या कारणामुळे निवडणूक आयोगाचे आभार मानले जाणून घ्या.

देशाची आज जी अवस्था आहे, त्यात बदल करण्याची गरज आहे. आपण सर्व मिळून हा बदल घडवून आणू शकतो. ज्या लोकांनी देशाला वेगवेगळी आश्वासने देऊन फसवलं. त्यांना दूर करण्यासाठी आपल्याला मतदानातून बाहेर करावं लागलं. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी देशावासियांना अनेक आश्वासने दिले होते. शेतकरी, दलित, महिला, आदिवासी आणि सर्वांना आश्वासने दिली. ती पूर्ण केली नाही. जे लोक आश्वासने देतात पण पूर्ण करत नाही, त्यांना दूर केलं पाहिजे. पुढच्या महिन्यात आपल्याला ती संधी मिळाली असल्याचं शरद पवार म्हणाले.

टीव्हीवर आपण एक खोटी गोष्ट ऐकली आहे. मोदींची गॅरंटी, ही गॅरंटी चालणारी नाही. खोटं आश्वासन देऊ त्यांनी आपल्याला वेगळ्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न केला. पण आजपासून टीव्हीवर ही गॅरंटी दिसणार नाही. कारण निवडणूक आयोगाने ती रोखण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानत आहोत. 42 मध्ये महात्मा गांधी यांनी छोडो भारत, छोडो हुकूमतचा नारा दिला होता. आता याच शहरात छोडो भाजप आणि भाजपसे मुक्ती असा नारा देत निर्धार केला पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा जाहीर केल्यावर आचार संहितेचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं.