मुंबई : देश संविधानानुसार चालवायचं असेल, तर एक देश एक नियम असला पाहिजे. दोन संविधान चालणार नाही. दोन प्रमुख चालणार नाही. दोन नियम चालणार नाही. एक निशाण, एक संविधान, एकनप्रधान, असं स्पष्ट मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, विरोधक हे याकूब मेमनचे पाठीराखे आहेत. त्यांना कितीही चांगलं काम करा तरी ते बोलत असतात. 370 कलम रद्द केलं. समान नागरी कायदा आणला तरी यांना पोट दुःखी आहे.
या देशात 6 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले तरी म्हणतात की कमी का दिले. जेव्हा तुमचं सरकार होतं तर का नाही दिलं. तुम्ही काय कुंभकरणाचेही बाप आहात का. तुमचं सरकार असताना तुम्ही झोपले होते का, असा सवाल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. भाजपनं काहीही मदत केली तर यांना त्रास होतो. या त्रासातून एक टीकात्मक सूर निघतो.
भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पोलिसांना त्यांनी बोलवावं. त्यांचं म्हणणं एकूण घ्यावं. ते आमदार आहेत. त्यांच्याकडे जास्ती माहिती असेल तर पोलिसांनी ती माहिती घेऊन कारवाई करावी.
दिवाळी फराळ वाटपावर मुनगंटीवार यांनी सांगितलं की, हे काय याचं वर्षी फराळ वाटप केले जात नाहीये. मुंबई आणि महाराष्ट्रात अशा या पद्धतीने फराळ वाटप केले जाते ही एक परंपरा आहे. यात ही राजकारण बघण्याइतके राजकारणाखाली जाता कामा नये.
मंत्रीमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले, विरोधकांकडे एक तरी मुद्दा शिल्लक ठेवावा लागेल. काहीही मुद्दे शिल्लक राहिलेलं नाही. राज्य उत्तम चाललं आहे. एखादातरी मुद्दा विरोधकांकडं असावा म्हणून आम्ही मंत्रिमंडळ विस्तार थोडा उशिरा ठेवला आहे, असंही त्यांनी गमतीनं सांगितलं.