Special Report : अपघात घडवून मला संपवलं जाऊ शकतं, सुषमा अंधारे यांनी अशी भीती का व्यक्त केली

| Updated on: Jan 07, 2023 | 12:08 AM

देवेंद्रजींना अधिवेशनात माझ्यावर बोलावं लागतं हे फार अवघड आहे. देवेंद्रजी ये डर मुझे अच्छा लगा. मै एन्जाय कर रही हुँ, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.

Special Report : अपघात घडवून मला संपवलं जाऊ शकतं, सुषमा अंधारे यांनी अशी भीती का व्यक्त केली
Follow us on

नागपूर : माझा घातपात होऊ शकतो, अशी भीती सुषमा अंधारे यांनी जाहीरपणे व्यक्त केली. ते तु्म्हाला डायरेक्ट शूट करण्याऐवजी तुमचा अपघातसुद्धा घडवून आणू शकतात. काहीही होऊ शकतं. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी मोठी शंका व्यक्त करत भाजपवर आरोप केलेत. माझ्याविरोधात कारवाईसाठी काही नाही. त्यामुळं अपघात घडवून मला संपवलं जाऊ शकते, अशी भीती सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे अधिकारीचं ही माहिती देत असल्याचा दावा अंधारे यांचा आहे.

माझ्यावर काय केसेस होतील. काही अधिकारी सांगतात. प्रवास रात्रीचा टाळा. घात-अपघात होऊ शकतो. अपघातात अनेक जण गेलेत. तुमच्यावर लावण्यासारखं काहीचं नाही. त्यामुळं डायरेक्ट शूट करण्याऐवजी तुमचा अपघातही घडवून आणू शकतात. माझी तिरडी बांधायची ठरवली काय. मी मात्र माझं काम करायचं ठरविलं आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केल्यानं पोलिसांनी दखल घ्यावी, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सरकार म्हणून प्रत्येकाच्या जीविताची चिंता करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळंच पोलिसांवर २१ हजार कोटींचा खर्च वाढविला आहे. या शंकेच्या संदर्भात मुल्यांकन केलं पाहिजे, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.

ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा असो की, ठाकरे गटाचे मेळावे. अंधारे भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडताहेत. गेल्या आठवड्याभरापासून अंधारे अधिकचं आक्रमक झाल्यात.

देवेंद्रजींना अधिवेशनात माझ्यावर बोलावं लागतं हे फार अवघड आहे. देवेंद्रजी ये डर मुझे अच्छा लगा. मै एन्जाय कर रही हुँ, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.

अहो एकनाथ भाऊ हे तुम्हाला संपवतील. संपवणार तुम्हाला. उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडं असलं तरी सर्व महत्त्वाची खाती त्यांच्याकडंच आहेत. न्याय, गृह, अर्थ खात त्यांच्याकडंच आहे. जलसंपदा, जलसंधारण खातंही त्यांच्याकडंच आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात.