सुषमा अंधारे यांना ठाकरे गटानं शिवसेनेत का आणलं, रामदास आठवले म्हणतात,…

| Updated on: Dec 09, 2022 | 9:41 PM

त्यांना आम्ही झुकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रामदास आठवले यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचितला दिला.

सुषमा अंधारे यांना ठाकरे गटानं शिवसेनेत का आणलं, रामदास आठवले म्हणतात,...
रामदास आठवले
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटात सुषमा अंधारे या जोरदार बॅटिंग करताना दिसतात. यासंदर्भात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, सुषमा अंधारे यांना टीका करण्यासाठीचं शिवसेनेत आणण्यात आलं. सुषमा अंधारे आधी आमच्या पक्षात होत्या. त्या संघर्षशील अशा नेत्या आहेत. त्या सक्रिय आहेत. त्या आधी माझ्या पक्षात होत्या. सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळं सुषमा अंधारे यांना उपनेतेपद दिलंय. त्या टीका करण्यात एक्सपर्ट आहेत. पण, त्यांनी सारखी टीका करू नये, असा सल्ला रामदास आठवले यांनी सुषमा अंधारे यांना दिलाय.

सारखी टीका करणं योग्य नाही, असं रामदास आठवले या सुषमा अंधारे यांना म्हणाले. ते कल्याण येथे पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले तरी काही फारसा फरक पडणार नाही. कारण भीमशक्ती ही माझ्यासोबत असल्याचं रामदास आठवले यांचं म्हणणंय.

शिवशक्ती आणि भीमशक्ती ही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात एकत्र आली होती. त्यानंतर शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रात झाला. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येत असतील, तर तो अधिकार त्यांना आहे. त्यांनी एकत्र यावं, पण, त्याचा फारसा परिणाम पडणार नाही.

कारण भाजप, शिंदे गट आणि आरपीआय हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. शिवशक्ती-भीमशक्ती आणि महायुती महाराष्ट्रात मजबूत आहोत, असही रामदास आठवले यांनी सांगितलं.

यावेळी आमचा झेंडा फडकणार आहे. ज्यांना एकत्र यायचं असेल त्यांनी यावं. आमची ताकत मोठी आहे. त्यांना आम्ही झुकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रामदास आठवले यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचितला दिला.