मुंबई मनपातील पक्षांची कार्यालयं आयुक्त पुन्हा उघडणार काय, किशोरी पेडणेकर यांना काय अपेक्षा?

| Updated on: Dec 30, 2022 | 11:07 PM

कालच्या राड्यापर्यंत ही पक्षांची कार्यालये सुरू होती. राडे काय होतात, हे सांगायची गरज नाही.

मुंबई मनपातील पक्षांची कार्यालयं आयुक्त पुन्हा उघडणार काय, किशोरी पेडणेकर यांना काय अपेक्षा?
किशोरी पेडणेकर
Follow us on

मुंबई : मुंबई मनपा कार्यालयात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले. त्यानंतर आयुक्तांनी पक्षांची कार्यालयं बंद केली. आता ती पक्षांची कार्यालयं पुन्हा सुरू करावीत, अशी मागणी केली जात आहे. त्यावर आयुक्त योग्य तो निर्णय घेतील. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या मनपा कार्यालयात गेल्या होत्या. त्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या, मी व्यक्तिगत कामासाठी पालिकेत आले होते. आयुक्तांनी सर्व कार्यालयं बंद असतील, अशी नोटीस दिली होती. हे कार्यालय राहू द्या, अशी विनंती आयुक्तांना केली होती. ते आयुक्तांनी मान्य केलं होतं.

कालच्या राड्यापर्यंत हे पक्षांची कार्यालये सुरू होती. राडे काय होतात, हे सांगायची गरज नाही. आयुक्तांना परत वाटलं असेल, शांततेत कामकाज चालणं आवश्यक आहे. नगरसेवकांचा टर्म संपलेला आहे. मारामाऱ्या भांडण होणार असतील, तर पक्षांची कार्यालयं बंद करणं उचीत आहे, असं त्यांना वाटलं असेल.

आयुक्तांना पुन्हा विनंती करण्यात आली. माजी महापौर, माजी नगरसेवक म्हणून कामकाज आहे. आयुक्त बघुयात किती ऐकतात ते, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मुंबईकर हे सगळं बघतोय. त्यांना दिसत आणि कळतंसुद्धा. जे चाललंय ते किती योग्य -अयोग्य हे निवडणुका लागल्यानंतर कळेल. लोकांचा जो काही कौल असेल तो मान्य असेल. वडिलांचं नाव घ्यायचं की, नाही. या दलदलीत न जाता लोकांची काम कशी करता येतील.

शिवसेना भवनावर काही जणांनी हक्क सांगितला. ती न्यायालयीन लढाई असेल, ती बघू. कुणाचं नाव काढणं, पट्टी काढणं हे लहान मुलांसारखी प्रकरण आहेत. त्यात मी जाणार नसल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.