मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | विधानसभेतील 16 आमदारांच्या अपात्रप्रकरणी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यात करा असे निर्देशही. कोर्टाच्या या निर्णयानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने दिल्ली गाठली. तेथे घटना तज्ज्ञांशी चर्चा करून रात्रीच ते पुन्हा मुंबईत परतले. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमची एक सुनावणी झाली आहे. दुसरी सुनावणी पुढील आठवड्यापासून शेड्यूल आहे. ही सुनावणी नियमित असेल असे नार्वेकर म्हणाले. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावणीला बोलावणार का असा प्रश्न त्यांना केला. त्यावर राहुल नार्वेकर यांनी गरज पडल्यास त्यांनाही सुनावणीला बोलावू, असे सांगितले.
विधान परिषदेमधील शिंदे गटाच्या आमदारांबाबतही आम्ही तालिका सभापती निर्नाज्न डावखरे यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. त्या आमदारांबाबतही निर्णया घेण्यास आणखी वेळ लावला तर विधानसभेच्या प्रकरणात जसा सुप्रीम कोर्टाने टोला लावला आहे तसाच पुन्हा लगावतील असे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाकडून यांना दट्ट्या पडल्याशिवाय हे काहीच कारवाई करत नाही. सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात निरीक्षण नोंदवले आहे. तसेच, एका आठवड्यात सुनावणी घ्या आणि पुढील कारवाई कशी असेल त्याची रूपरेषा द्यायला सांगितली आहे. अपात्र आमदार यांना वाचण्याचा कुठलाही मार्ग नाही ते अपात्र होणारच असे अनेक कायदेतंज्ञाचे मत आहे असे परब म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गरज पडल्यास सुनावणीला बोलवू असे विधान केलंय. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे उपस्थित राहतील किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी या सुनावणीला उपस्थित असेल. आमच्याकडे २० लाख पक्षाचे सदस्य आहेत. तसेच, आम्ही साडेचार लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.