मुंबई : विरोधी पक्षाकडून अपेक्षा होती की, पंतप्रधान (Prime Minister Modi) आल्यावर या चार गोष्टी केल्या पाहिजे, असं म्हणायला पाहिजे होतं. पण, टोमणे मारायची सवय पडली आहे. सकाळपासून तिचं कॅसेट सुरू असते. त्याची आम्हाला सवय झाली आहे. विरोधी पक्ष म्हणून विधायक सूचना येतील, अशी अपेक्षा राहिली नाही, असा टोला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी लगावला. विरोधी पक्षाकडून सकाळी विधायक सूचना येत नाही. टोमणेबाजीनं सकाळी सुरू होते. पक्षाचा प्रमुख म्हणून संजय राऊत (Sanjay Raut) यांना विनंती राहील की, सकाळी बोलताना राज्याच्या विकासावर बोललं पाहिजे, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.
निवडणुकी कधी लागणार माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयात केस आहे. सर्वोच्च न्यायालय केव्हा निकाल देईल, हे माहिती नाही. निवडणुकीचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा संबंध काय, असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला.
पंतप्रधानांनी नागपूर दौरा केला. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं. ७५ हजार कोटी रुपयांची कामांची सुरुवात करण्यात आली. मुंबईचा दौरा हा विकासाचा आहे. महाराष्ट्र एकनंबरवर यावा. यासाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौरा आहे.
केंद्राची मदत पाहिजे होती, तर पंतप्रधानांना का बोलावलं नाही. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडं गेलं पाहिजे. विकासाची काम आणली पाहिजे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतो. त्यांच्याकडून आपल्या जिल्ह्यातील कामं खेचून आणतो. तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडं गेलं पाहिजे. राज्यात विकासाची काम केली पाहिजे.
तुम्ही अडीच वर्षांत कधी पंतप्रधानांना भेटले का. त्यांच्याकडून काही मदत मागितली का, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदी यांची मदत मागत आहेत. अशा पंतप्रधानांच्या दौऱ्यातून विकास मिळतो.
मुंबई मनपाचा पैसा म्हणजे कुणाची प्रापर्टी नाही. हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशातून जनतेचा विकास करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत. राज्याच्या विकासाचा संकल्प यानिमित्तानं केला जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.