ठाणे : चार दिवसांपुर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना मिरारोड परिसरात घडली. आत्महत्या केकेल्या नवविवाहितेचं नाव हिना शेख आहे. तिने आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मिरारोडच्या भारतीय पार्क परिसरात असलेल्या मातोश्री या इमारतीत हिना शेखचे आई-वडील राहतात. याच घरी हिनाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
हिनाचा 11 नोव्हेंबरला कांदिवली येथील रमज़ान शेख याच्याची विवाह झाला. त्याच्या चार दिवसांनी हिना कांदिवलीहून आपल्या माहेरी आली. तेथे तिने गळफास लावत आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नयानगर पोलिसांनी अाकस्मिक मृत्युूचा गुन्हा दाखल करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.