मुंबई: वरळीत झालेल्या सिलिंडर स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी वरळी विधानसभेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. वरळीत सिलिंडर स्फोट झाला होता. या दुर्घटनेतील तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आधी लहान मुलाचा. नंतर त्याच्या वडिलांचा आणि आता त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही अत्यंत दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे. स्थानिक आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
30 नोव्हेंबर रोजी वरळीच्या गणपतराव जाधव मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक 3 मध्ये सिलिंडर स्फोट झाला होता. त्यात चार जण होरपळले होते. यातील काही जणांना नायर तर काही लोकांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हा उपचार सुरू असताना मंगेश पुरी या चार महिन्याच्या बाळाला 1 डिसेंबर रोजी मृत घोषित करण्यात आले होते. त्यानंतर आनंद पुरी (वय 27) यांचा 4 डिसेंबर रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. तर विद्या पुरी (वय 25) यांचा काल मृत्यू झाला होता. तर या दुर्घटनेत एक पाच वर्षाचा मुलगा 15 ते 20 टक्के होरपळला आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने वरळीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वरळी दुर्घटनेतील बालकावर नायर रुग्णालयात वेळीच उपचार मिळाले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत भाजप नेते आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला होता. वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जात असेल आणि तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर 72 तासांनी महापौर रुग्णालयात पोहचल्या. 72 तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल आमदार शेलार यांनी उपस्थित केला आहे. मुंबई पालिकेचा मुंबईकरांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे म्हणत शेलार यांनी मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला होता.
तर नायर रुग्णालयाच्या या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ भाजपच्या आरोग्य समितीतील सदस्यांनी राजीनामे देऊन निषेध नोंदवला होता. त्यानंतर या घटनेवरून भाजप नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना घेराव घालून जाब विचारण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे महापालिकेत काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं.
3 rd death in the Worli cylinder blast incident!!
Little baby..father n now the mother!!
The entire family is wiped out thanks to shameless @MCGM_BMC n the state Gov!! The local MLA n Mumbai Guardian Minister Aditya Thackray shud resign if he has any Shame left! @CMOMaharashtra— nitesh rane (@NiteshNRane) December 7, 2021
संबंधित बातम्या:
Sanjay Raut: शिवसेना उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत युती करणार?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान