मुंबई – दिवार चित्रपटाच्या डॉयलॉगनं संजय राऊत शिंदे गटावर तुटून पडले. मेरा बाप चोर हैं प्रमाणं, तुम्ही गद्दारचं आहात, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली आहे. दिवार चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या हातवर लिहिले असते, मेरा बाप चोर हैं. तसंच हे गद्दार आहेत, अशी टीका शिंदे गटातील आमदारांवर केली. नाशिकच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, बघा यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलाय. यांच्या पिढ्यानंपिढ्यांना ही गद्दारी आता शांतपणे जगू देणार नाही.
यावर शिंदे गटाकडून पलटवारही झाले. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड जिभ घसरली. गायकवाड यांनी थेट शिवीगाळचं केली. आमच्यावर उठावाची क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पिढीला वाटणार आहे. त्यामुळं संजय राऊत तू यानंतर अशी भाषा वापरू नको, असा इशाराचं संजय गायकवाड यांनी दिला.
पाडायचं की, लढायचं हे लोकांना माहीत आहे. लोकांना आम्हाला शिवसेना-भाजप म्हणून निवडून दिलं होतं. चित्रपट चित्रपटाच्या ठिकाणी आहे. तू तुझा पक्ष किती भूईसपाट केला आणि आमच्या किती जागा निवडून येतील, हे वेळचं ठरवेल, असा सज्जड दम संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना दिला.
संजय शिरसाट म्हणाले, मला वाटतं संजय राऊतला पिसाळलेला कुत्रा चावलाय. स्वतःच घरं सांभाळ ना. तीन महिने आराम करून आला तरी कशाला अकलेचे तारे तोडायला लागलास आता. हाच माणूस राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी आमच्या पाया पडत होता हो. तो काही माणसातून निवडून आलेला आहे का. दरवेळी आम्ही त्याला मतदान करत होतो.
तो आम्हाला काय शिकवतो. याच्या जीवावर आम्ही निवडून येतो का. याच्या जीवावर आमची निवडणूक चालते का, असा सवालही संजय शिरसाट यांना उपस्थित केला.
त्यानंतर संजय राऊत यांनी आपला मोर्चा वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्याकडं वळविला. गद्दारीमुळं बोरणारे यांना लोकांकडून फक्त चपलाचं मारणं बाकी होतं, अशी टीकाही राऊत यांनी केली. लोकं बोलतात त्यांना खोकेवाले आम्ही कुठं बोलतो, असा टोलाही त्यांनी लगावला.