मुंबई : शिंदे गटाचे माजी नेते रामदास कदम यांच्या मुलाचा रात्री अपघात झाला. पण, हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. कदम यांना या घातपातामागे उद्धव ठाकरे असल्याचा संशय येतो. आपल्या माजी पक्षप्रमुखावर रामदास कदम यांनी संशय व्यक्त केलाय. तो योगेश कदम यांच्या घातपाताचा. योगेश कदम यांच्या गाडीचा कशेडी घाटात अपघात झाला. पाठीमागून येणाऱ्या टँकरनं योगेश कदम यांच्या गाडीचा जोरदार धडक दिली. अपघातानंतर टँकर उलटला. टँकरचा चालक पळून गेला. त्यामुळं हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय योगेश कदम यांनी व्यक्त केला.
दोन्ही बाजूला एसकार्टच्या गाड्या असताना माझ्या गाडीला धडक देणं हे संशयास्पद असल्याचं योगेश कदम म्हणाले. त्यानंतर रामदास कदम यांनी संशयाची सुई उद्धव ठाकरे यांच्याकडं वळवली.
हा अपघात नसून घातपात करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असा माझा संशय असल्याचं रामदास कदम म्हणाले. योगेश कदमला पूर्णपणे राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. पण, त्यांना त्यात यश आले नाही. त्यामुळं आता जीवनिशी संपविण्याचा प्रयत्न केला की काय, असा संशय मला येत असल्याचंही रामदास कदम यांनी सांगितलं.
मातोश्रीवर आधी घातपाताचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. आता रामदास कदम यांनी अपघाताच्या घातपाताबद्दल थेट मातोश्रीकडे बोट दाखविलंय. पोलीस चौकशी होईल. त्यानंतर काय ते प्रकरण समोर येईल.