‘तुम्ही काही रेल्वेचे जावई नाहीत….’,पोस्टर बॉय चेतनचा रिल का होतोय व्हायरल

| Updated on: Feb 19, 2024 | 3:41 PM

रेल्वेला विनातिकीट प्रवाशांमुळे प्रचंड तोटा होत असतो. या विषयाला आता पोस्टर बॉय चेतन कोलगे यांनी वाचा फोडली आहे. त्याने मराठमाेळ्या भाषेत प्रवाशांना उपदेशाचे डोस पाजले आहेत. त्याची रिल्स खूपच प्रसिध्द असून व्हायरल होत आहेत.

तुम्ही काही रेल्वेचे जावई नाहीत....,पोस्टर बॉय चेतनचा रिल का होतोय व्हायरल
poster boy chetan kolge
Follow us on

मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वेचे प्रचंड नुकसान होत असते. रेल्वे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात सातत्याने तिकीट चेकींग मोहीमा राबवित असते. या मोहीमेत प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसुल करीत असते. आता रेल्वेच्या मदतीला मराठामोळा पोस्टर बॉय धावून आला आहे. या पोस्टर बॉयने तयार केलेला रिल्स चांगलाच व्हायरल झाला आहे. यात त्याने तिकीट न काढता फुकट…फिरायला तुम्ही काही रेल्वेचे जावई नाहीत, अशा आशयाचा बोर्ड ( पोस्टर ) हातात हातात घेऊन रिल तयार केला असून तो आता समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तिकीट न काढता फुकट.. फिरायला आपण काही रेल्वेचे जावई नाहीत’, अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन पोस्टर बॉय चेतन कोलगे याने पश्चिम रेल्वेच्या ‘मेरा तिकीट मेरा इमान’ स्पर्धेत सहभागी होत फुकट्या प्रवाशांना मराठमोळा डोस दिला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने ‘मेरा तिकीट मेरा इमान’ स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा 25 डिसेंबर ते 25 जानेवारी या कालावधीत पार पडली. यात 350 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात चेतन कोलगे या तरुणाने सहभाग घेतला होता. चेतन कोलगे विविध सामाजिक विषयांना आपल्या लिखाणातून वाचा फोडत असतो. त्याने मागे पोलिसांवर लिहीलेले पोस्टर्स खूपच मार्मिक होते.

कोरोना काळात सुचली आयडीया

चेतन कोलगे हा एका खासगी कंपनीत काम करतो. कोरोनानंतर चेतन कोलगे याने सामाजिक विषयांवर पोस्टर लिहून ते पोस्टर हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी उभे राहून लोकांचे लक्ष वेधण्याचे नवे प्रसिद्धी तंत्र सुरु केले. आधी लोकांनी याकडे फारसे गांभीर्याने पाहीले नाही. लोकांना हा वेडसरपणा वाटला. परंतू चेतन याचे विषय खूपच इंटरेस्टींग असल्याने त्यांच्या रिल्स खूपच व्हायरल होऊ लागल्या. त्यामुळे आता त्याला पोस्टर बॉय हे नाव पडले आहे. चेतनचे पोस्टर समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाले आहेत. चेतनने रेल्वे स्थानक आणि लोकल ट्रेनमध्ये पोस्टर घेऊन तिकिटांसह प्रवास करण्याचे महत्त्व मराठी भाषेत प्रवाशांना पटवून देत आहे.