मुंबई : आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, अब्दुल सत्तार यांना शेतीमधील काही ज्ञान नाही. त्यामुळे यांच्याकडे फार अपेक्षेने बघू नये. शिक्षकांच्या (Teacher) व्यथा आम्ही उपमुख्यमंत्र्यांनाच थेट सांगत आहोत. कारण आम्हाला माहीत आहे. मुख्यमंत्र्यांना सांगून त्याचा फायदा नाही. कारण ते शेवटी उपमुख्यमंत्र्यांनाच विचारणार आहे. दिवाळीच्या तोंडावर लोकं आंदोलन करत आहेत. त्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर वर्षावर दिवाळी साजरी करावी लागेल. पक्ष राजकारणात शिक्षकांना वेठीस धरू आहेत. चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्या राणे पिता-पुत्रांवर पोलीस कारवाई करत नाहीत.
माझ्यावर भास्कर जाधव आणि इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. तुम्ही केसेस कराल… केसेस करून थकाल. पण आमचा लढण्याचा,संघर्ष करण्याचा इरादा थांबू शकत नाही, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.
बाटगे, अस्पृश्य, वाळीत टाकणे, पुन्हा परत घेणे, ही जातव्यवस्था कायम ठेवणारी वाक्य ही फक्त मनुवादी संस्कृतीत असणारी लोकच वापरू शकतात. आशिष शेलार हे मनुवादी संस्कृतीचे वाहक आहेत. त्यांनी आमच्यावर टीका करणे फार नवलाचे नाही.
माध्यमांनी कंड्या पिकवू नये. आमच्यात भांडण लावू नये. दीपाली सय्यद आमच्या सोबत आहेत. त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं. वरळी दीपोत्सवाबद्दल बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपने अशा अनेक बाबी अनेक वेळा केल्या आहेत. इथल्या मराठी माणसांचा मराठीचा अवमान भाजपने केला आहे.
राज्यपाल कोशारी यांनी महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला आहे. त्यावर भाजप बोलत नाही. राणे पिता-पुत्र स्टेडियममध्ये नाहीत आणि ग्राउंडमध्ये नाहीत. पॅडवगैरे बांधून पॅवेलीनमध्ये बसले आहेत. ग्राउंडमध्ये येण्यासाठी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्य ते करत असतात. आमच्यावर याचा काहीही फरक पडत नाही. यांनी होमवर्क करावा.