औरंगाबाद – हिजाबचं प्रकरण (Hijab controversy) देशभर गाजलं, तसेच अनेकांनी या प्रकरणाचा निषेध देखील केला. तर अनेकांनी त्याचं समर्थन केलं. आता कुठे तरी हे प्रकरण थंड झाल्याचं पाहायलं मिळत होत, पण वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) मुस्कान खानचा (muskan khan) सत्कार करण्याच जाहीर केल्यापासून औरंगाबाद (aurangabad) भाजपचे (bjp)कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला असून हा कार्यक्रम होऊ नये यासाठी त्यांनी पोलिस आयुक्तालयात पत्र दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे औरंगाबादेत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते कर्नाटकातील हिजाब धारी बेबी मुस्कान खान हिचा 14 मार्चला सत्कार होणार आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा डोके वरती डोके वरती काढेल. सत्कार केल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी दिला आहे.
काय हिजाब प्रकरण
कर्नाटकमध्ये एका कॉलेजमध्ये तरूणी हिजाब घालून प्रवेश करीत असताना तिला पाहून काही तरूणांनी तिला पाहून घोषणा दिल्या. तरूणांनी भगवी कपडे परिधान करून तरूणीच्या समोर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. ही बाब तरूणीच्या लक्षात आल्यानंतर तिनेही तरूणांना प्रत्युत्तर म्हणून अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशातलं वातावरण गरम झालं. कर्नाटकमधल्या अनेक शाळा सुध्दा त्यावेळी राज्य सरकारने बंद केल्या. कारण परिस्थिती चिघळण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक पालकांनी आपली मुले शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. देशात अनेकांनी या प्रकरणाचा निषेध नोंदविला तर अनेकांनी समर्थन देखील केलं. अनेक दिवसांपासून हे प्रकरण शांत होतं. परंतु औरंगाबादमध्ये सत्कार करणार असल्याचे जाहीर होताचं अनेकांनी विरोध दर्शविला असल्याचे समोर आले आहे.
सत्कार झाल्यास वातावरण चिघळणार
अनेक दिवसांपासून हे प्रकरण शांत असल्याचं पाहायला मिळत होतं. परंतु कर्नाटकातील हिजाब धारी बेबी मुस्कान खान हिचा 14 तारखेला सत्कार होणार असल्याचे समजताचं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने सत्कार केल्यानंतर नेमकं काय होणार ? किंवा वंचित बहुजन आघाडी सत्कार करणार का ? असा अनेकांना प्रश्व नक्की पडला असणार असं वाटतंय. सत्कार केल्यास रस्त्यावर उतरण्याचा शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी इशारा दिला आहे.