ठाणे : 11 सप्टेंबर 2023 | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पक्ष आणि चिन्ह यावरही दावा सांगितला. झाडावरूनच धक्के मारून त्यांना बाहेर काढण्यचा पर्यटन करता आहात. पण, माझा बाप मजबूत आहे. या सर्व टाळ्यांची मास्टर चावी त्याच्याजवळ आहे असा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. बदलापूर येथे संवाद दौरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी आमदार आव्हाड यांनी सरकारवरही निशाणा साधला.
बदलापूर येथील अजय राजा हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रामधील राजकीय वातावरणाचा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात राग आहे, असे त्यांनी सांगितले.
आगामी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष एकत्रित जागा लढणार आहोत. ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या १८ जागा आहेत. त्यापैकी कमीत कमी १४ जागा हमखास जिंकू असा दावा त्यांनी केला.
‘राष्ट्रवादीचे काही आमदार सत्तेत गेले. वेगळी भूमिका घेतली. तुम्हाला राष्ट्रवादीच्या नावामुळे आणि चिन्हामुळे मते मिळाली होती. शरद पवार यांनी एक छोटे वृक्ष लावलं, ते वाढवलं, त्याचा मोठा वृक्ष केला. तुम्ही डायरेक्ट त्या वृक्षाचा टोकाला जाऊन बसले. आणि आता पक्ष आमचा सांगता?’
‘त्या माणसाला काय वाटत असेल. त्या बापाला काय वाटत असेल? मी झाड तयार केलं. झाड नटवलं, घडवलं, सजवलं आणि आता मलाच धक्के मारत बाहेर काढताय. माझा बाप मजबूत आहे. या सर्व टाळ्यांची मास्टर चावी त्याच्याजवळ आहे.’ असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावत आव्हाड यांनी आपला रोष व्यक्त केला.