नागपुरात कोरोनाचं संकट गडद, दररोज हजारच्यावर नवे रुग्ण, प्रशासन चिंतेत

| Updated on: Mar 07, 2021 | 2:59 PM

नागपूर शहरात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे (Nagpur Corona Virus Update).

नागपुरात कोरोनाचं संकट गडद, दररोज हजारच्यावर नवे रुग्ण, प्रशासन चिंतेत
Nagpur Corona Update
Follow us on

नागपूर : नागपूर शहरात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे (Nagpur Corona Virus Update). एकीकडे लसीकरणाने जोर पकडला असला तरी रोज येणारी रुग्ण संख्या चिंता वाढवत आहे. नागपूरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे (Nagpur Corona Virus Update COVID Patients Increases Day By Day).

राज्याची उपराजधानी कोरोनाच्या विळख्यात आहे. दररोज नागपूरात हजारच्यावर नवे रुग्ण निघत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यात नागपूर शहरात दुसऱ्यांदा रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला सुरवात झाली आहे. 100 ते 200 च्या घरात असलेला आकडा आता हजाराच्य घरात पोहोचला आहे.

एकीकडे लसीकरण होत आहे. मात्र, दुसरीकडे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे टेस्टचं प्रमाण सुद्धा वाढविण्यात आलं आहे. शहरात 14 तारखेपर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. त्यानुसार, शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं. याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्केट बंद ठेवले. मात्र, रस्त्यावर विनाकामाने फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. अशा विनाकामाने फिरणाऱ्यांना महापौरांनी चांगला सल्ला दिला.

Nagpur Corona Update

नागपूर शहराच्या परिस्थिती –

>> नागपुरात सलग चौथ्या दिवशीही हजारावर नवे रुग्ण

>> गेल्या 24 तासात 1,183 नवीन रुग्ण आढळले

>> 9 जणांचा मृत्यू झाला

>> सक्रिय रुग्णांनी ओलांडला 10 हजारचा टप्पा

>> नागपुरात आतापर्यंत 1,56, 458 रुग्णांची नोंद

>> बरं होणाऱ्यांची आतापर्यंतची सांख्या 1, 41, 429

>> एकूण मृत्यूची संख्या – 4,383

Nagpur Corona Virus Update COVID Patients Increases Day By Day

नागपूरची रुग्ण संख्या वाढतीच

नागपुरात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. तर टेस्टची संख्या सुद्धा दिवसाला 10 हजारच्यावर आहे. तरी सुद्धा रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कठीण निर्बंध घालून दिले असले तरी त्याचं पालन काही लोक करताना दिसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस संकट गडद होत आहे.

Nagpur Corona Virus Update COVID Patients Increases Day By Day

संबंधित बातम्या :

टेन्शन वाढले! नागपूर, औरंगाबादेत रुग्ण आणि मृत्यू संख्या वाढली; कोल्हापूर- नागपूर 12 मार्चपासून सुरू होणार

विळखा वाढला! मुंबई, पुणे, नागपूर, कोरोनाचा स्फोट, राज्यात दिवसभरात 8 हजार 702 नवे बाधित

Corona Update | नवी मुंबई, नागपूर, जळगावात कोरोना नियमांचा फज्जा, कुठे विनामास्क तर कुठे सोशल डिस्टन्सिंगला हरताळ!