नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजवला, आता तिसरी लाट थोपवण्यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे मिशन मोडवर काम करतायत. जिल्ह्यातील आठ मोठ्या शहरांना रविंद्र ठाकरे यांनी एकाच दिवशी भेटी दिल्या आणि तिथल्या स्थितीचा आढावा घेतला (Nagpur District Collector Reviewed The Health Condition Of Eight Municipal Councils In One Day).
पावसाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी 100 टक्के लसीकरण करा, अशाप्रकारचं टार्गेट जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलंय.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, हिंगणा, वानाडोंगरी, वाडी, सावनेर, खापा, मोहपा आणि कळमेश्वर नगरपरिषदेला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान मान्सूनपूर्व तयारीचा आढावाही त्यांनी घेतलाय. यावेळी सर्व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
परिसरातल्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने लग्न आणि कार्यक्रमानिमित्त छोट्या छोट्या शहरांमध्ये येतात. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी, मंगल कार्यालय, रिसॉर्ट, हॉटेल्स या ठिकाणी जमणारी गर्दी, त्या ठिकाणी शासकीय नियमांची पायमल्ली होणार नाही. याबाबतची यंत्रणा आणखी सक्त करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
नागपुरकरांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे तब्बल वर्षभरानंतर नागपूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या शंभराच्या खाली आली आहे. गेल्या 24 तासांत शहरात 46 तर, ग्रामीण भागात 33 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ही गेल्या वर्षभरातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. 24 तासांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 86 आहे, तर चार मृत्यू झाला आहे. तसेच 24 तासातला कोरोना संसर्गाचा दर 0.96 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. सध्या जिल्ह्यात 2922 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाने सोडलं अन् म्युकरमायकोसिसने घेरलं, तब्बल 1 कोटी 48 लाखांचा खर्च, शेवटी प्राण वाचले ?https://t.co/zdKLiZE335#Mucormycosis | #CoronaPandemic | #NagpurFightsCorona
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 8, 2021
Nagpur District Collector Reviewed The Health Condition Of Eight Municipal Councils In One Day
संबंधिक बातम्या :
Nagpur Unlock Update | नागपूर बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी
Nagpur Unlock | अनलॉक अंतर्गत नागपूरमध्ये नवी नियमावली, सायंकाळी 5 नंतर जमावबंदी, काय बंद काय सुरु